Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

गौरी गणपती बाप्पाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन,

 गौरी गणपती बाप्पाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन,

 

 इंदिरा गांधी नगरवासीयांचे अखेर स्वप्न पूर्ण,


माथेरान मध्ये एकूण 65 घरगुती गणपती व एक सार्वजनिक  गणपतीचे विसर्जन


चंद्रकांत सुतार--माथेरान माथेरान मध्ये आज घरगुती  आणि सार्वजनिक दीड दिवसाचे गौरी गणपतीचे एकून65 गणपतीचे  भक्ती मय वातावरणात विसर्जन  करण्यात  आले.

 इंदिरा नगर भागात  मायरा पॉईंट येथे  12 महिने जिवंत झरा वाहत असल्या ठिकाणी  ब्रिटिशकालीन पाण्याची टाकी आहे,

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर  गणपती विसर्जनाचे ही काही नियम अटी, आव्हान  केली गेली त्याला अनुसरून इंदिरा नगर मधील सर्व गणेश धारकांनी  निर्णय घेतला की ह्या वर्षी आपले  गणपती हरिसन स्प्रिंग येथेच विसर्जन करायचे, आणि श्रमदानातून ती पाण्याची टाकी साफ करत, सर्व गाळ कचरा  बाहेर काढला लिकेज बंद केल्याने एका दिवसातच ती टाकी 10 फूट भरल्याने , दीड व पाच दिवसाचे इंदिरा भागातील एकूण 11 गणपती व गौरी याचे विसर्जन आज  करण्यात आल्याने सर्व इंदिरा नगर वासीय समाधान आनंद व्यक्त करीत आहेत,

दोन दिवस गौरीचे घरात आगमन झाल्या नंतर  काल  महिलाचा गौरी पूजन ववसा भरणे कार्यक्रम असतो , ठीकठिकाणी गौरी घरीच पूजन करणे पसंत केले असले तरी गौरी पूजन दिवशी नेमकाच बुधवार आल्याने  वडे मटणाचा नैवेद्य दाखवून गौरी पूजन केले, काही ठिकाणी स्वतःची सुरक्षा बरोबर संपूर्ण गावाचीच सुरक्षितता लक्षता घेऊन प्रशासनाने अनेक नियम , निर्भन्ध लावले होते, त्यास सर्व नागरिकांनी  उस्फूर्त  पाठिबा  सहकार्य देत गणेशोस्तव सण साजरा केला, 


आज कोरोनाच्या परिस्थिती  सर्व नियमानचे पालन करत  पाच दिवस सेवा करून आज भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाचे  गौरीचे , हरिसन स्प्रिंग, व  शारलोट लेक तलाव,  वॉकर टॅन्क (बादली) येथे तर काहींनी आपल्या घरीच  गणपती विसर्जन केले , मुख्याधिकारी प्रशांत जाधव नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, एपीआय प्रशांत काळे साहेब  कर्मचारी वर्ग  विसर्जन ठिकाणी सर्व परिस्तिथीवर नियंत्रण करत  भक्तिमय वातावरणात  विसर्जन करून घेतले, संपूर्ण जगावर  कोरोना चे संकट आले आहे ते दूर होण्यासाठी साकडे घालून लवकरच माथेरान पूर्वी प्रमाणे हसते खेळत होऊंदे , लवकरच नवी आशा नवी दिशा दिसूंदे   असे भावनिक साकडे  यावेळी सर्वच गणपती धारकानी  आपल्या बाप्पाकडे केली .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies