Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

साताऱ्यात पावसाची झोड;उरमोडी धरणातून पाण्याचा विसर्ग!

 साताऱ्यात पावसाची झोड;उरमोडी धरणातून पाण्याचा विसर्ग!

मिलिंद लोहार -सातारा

गेल्या 24 तासात जिल्ह्यात  एकूण सरासरी  42.78 मि.मी. पाऊस

 जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी  42.78 मि.मी. पाऊस झाला आहे.


 जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा 72.53  (600.67)  मि. मी., जावली – 70.18 (1005.56) मि.मी. पाटण – 46.00 (937.63) मि.मी. कराड – 23.38 (429.07) मि.मी., कोरेगाव – 33.33 (392.83) मि.मी. खटाव – 29.66 (340.06)  मि.मी.  माण – 13.57 (291.57) मि.मी., फलटण – 10.44 (280.62) मि.मी. खंडाळा – 20.54  (340.70)  मि.मी. वाई – 32.29 (532.97) मि.मी.  महाबळेश्वर – 181.93 (3437.18)  याप्रमाणे आजपर्यंत एकूण  8588.87  मि.मी. तर सरासरी. 780.81 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. 

                                                   


 जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी

कोयना धरणात आज 77.26 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 77.17  इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 112 नवजा येथे 122  व महाबळेश्वर येथे  177 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 7.92 (67.78), धोम -बलकवडी- 3.52 (88.78), कण्हेर – 7.85 (81.85), उरमोडी – 8.92 (92.41), तारळी- 4.60 (78.74), निरा-देवघर 7.25 (61.83), भाटघर- 17.40 (74.03), वीर – 9.20 (97.85).

उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिनांक १३/८/२०२० पासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून सध्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे आज दिनांक १४/८/२०२० रोजी सकाळी १० वाजता जलाशय परिचालन सूचिनूसार धरणाचे वक्रद्वारामधून 2600 व विद्युत गृहातून 400    क्यूसेक्स एवढा विसर्ग उरमोडी नदीत सोडण्यात येणार आहे तरी धरणाच्या  खालील बाजूचे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घ्यावी ही विनंती.


                       कार्यकारी अभियंता

                    कृष्णा सिंचन विभाग, सातारा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies