उद्या सातारकरांना जिलेबी मिळणार नाही. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 14, 2020

उद्या सातारकरांना जिलेबी मिळणार नाही.

उद्या सातारकरांना जिलेबी मिळणार नाही.

 

कलम 144 नुसार मिठाईची दुकाने राहणार बंद..

मिलिंद लोहार-सातारा


 जिल्हादंडाधिकारी सातारा यांच्या दि. 11 ऑगस्ट 2020 रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या व कायदा वसुव्यवस्थेच्या अनंषंगाने कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी  जिलेबी , मिठाई पदार्थांचे उत्पादन  तसेच विक्री व वाटप करण्यास दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी 00.00 वा. पासुन ते 24.00 वा. पर्यंत  क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 प्रमाणे सातारा जिल्ह्यात मनाई आदेश पारित करण्यात आले होते.  

 या आदेशामध्ये स्पष्टोक्ती नसल्याबाबत मिठाई संघटनेमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे मिठाई संघटनेच्यावतीने श्री. चंद्रकांत चंदु मिठाईवाले, श्री. राऊत तसेच श्री. कन्हयालाल राजपुरोहित यांनी समक्ष भेटून  मिठाईची दुकाने चालु ठेवावीत अगर कसे याबबात स्पष्टीकरणात्मक मार्गदर्शन मिळण्याविषयी विनंती केली. 

 त्यानुसार वरील आदेशानुसार कोणत्याही सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी जिलेबी, मिठाई पदार्थांचे उत्पादन तसेच विक्री व वाटप करण्यास मनाई करण्यात आली आहे, असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. याचाच अर्थ दुकाने बंद राहतील असा आहे. 

  कोरोना या विषाणूचा वाढता संसर्ग पाहता, सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी मोठ्या प्रमाणावर जिलेबी तसेच मिठाईचे वाटप होण्याची शक्यता असल्याने व परिणामी सोशल डिस्टसिंगचे पालन होणे शक्य नसल्याने, सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच घरगुती ठिकाणी सर्व प्रकारची मिठाई पदार्थांचे उत्पादन, विक्री व वाटप करणारी सर्व मिठाईची दुकाने, स्टॉल, टपरी इत्यादी दि. 15 ऑगस्ट रोजी पूर्णपणे बंद ठेवायची आहेत.

No comments:

Post a Comment