आ.सुमन वहिनी यांच्यावर केलेले आरोप म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा पब्लिसिटी स्टंट !! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 30, 2020

आ.सुमन वहिनी यांच्यावर केलेले आरोप म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा पब्लिसिटी स्टंट !!

 आ.सुमन पाटील यांच्यावर केलेले आरोप म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा पब्लिसिटी स्टंट !!

उमेश पाटील-सांगली          वंचित बहुजन आघाडीकडुन आ.सुमन आर . पाटील  यांच्यावरती तथ्यहिण आरोप करणेत आलेले आहेत.सध्या चालू असलेल्या कोवीड १९महामारी मध्ये देखील त्यांनी आपले लोकसेवेचे काम तितक्याच तडफेने व आपुलकीने  अखंड सुरु आहे .तसेच कोविड-१९ संदर्भात देखील आमदार पाटील व महाविकासआघाडीचे कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते यांना बरोबर घेउन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत . विरोधकांकडे  कोणतेही मुद्दे नाहीत. त्यांना कोणताहि जनाधार नसलेने सवंग प्रसिद्धीसाठी टिका व खोटे आरोप करत आहेत .परंतु सामान्य जनतेस आमदारांचे प्रामाणिक काम माहिती असल्याने आम्ही  तासगांव तालुक्यामधील सर्वसामान्य जनता आ.पाटील यांच्या  सोबत ठामपणे उभे आहोत. असे पत्र तासगांव तालुका परीसरातील सुधीर जाधव,DA पाटील, रणजी पाटील, सुशांत पाटील, डॉ दीपक पाटील इत्यादी नागरिकांमार्फत खा.शरदचंद्र पवार यांना पाठविण्यात आले.

      याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना 

"आ.सुमन पाटील यांच्यावरीलआरोप हे बिनबुडाचे आहेत .सामान्य जनता हे आरोप कदापी सहन करणार नाही, तसेच कर्तव्यदक्ष आमदारांवरील आरोप म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा पब्लिसिटी स्टंट ."असे NH266 संघर्ष समितीचे सुधीर जाधव यांनी सांगीतले. या बाबत निमणी गावचे दिपक पाटील म्हणाले  ", सदर घटनेने वंचित बहुजन आघाडीचा दुटप्पीपणा व वैचारिक दिवाळखोरी समोर आलेली आहे.प्रश्न कोणाला विचारावेत याचे भान त्यांना राहिलेले नाही.केवळ साॅफ्ट टार्गेट म्हणुन प्रसिद्धिच्या हव्यासापोटी आमदार सुमन पाटील यांच्यावर टिका केली जात आहे.'

No comments:

Post a Comment