कर्जत भाजपचा ठाकरे सरकार विरोधात घंटानाद - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 28, 2020

कर्जत भाजपचा ठाकरे सरकार विरोधात घंटानाद

 कर्जत भाजपचा ठाकरे सरकार विरोधात घंटानाद

ज्ञानेश्वर बागडे-

महाराष्ट्र मिरर टीम- कर्जत


कोरोना प्रादुर्भाव काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल,मांस,मदिरा पुनश्च हरी ओम च्या नावाखाली सर्व काही चालू केलं मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मद्य मुबलक सुरू असून भजन पूजन करणाऱ्या भाविक, भक्तांवर गुन्हे दाखल होत आहेत.,भाविक भक्तांना जेल आणि गुन्हेगारांना बेल ,असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू आहे.असं सांगत कर्जत भाजपाच्या वतीने कपालेश्वर मंदिरासमोर घंटानाद करण्यात आला.भाजपच्या वतीने आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या.यावेळी रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे,,किसान मोर्च्यांचे सुनील गोगटे,नगरसेवक अशोक ओसवाल, बळवंत घुमरे,स्नेहा गोगटे,शर्वरी कांबळे, स्वामीनी मांजरे ,रोहित बाफना,दीपक वैद्य, गोडबोले,काका वैद्य सह भाजपचे अनेक पदाधिकारी या घंटानादमध्ये सहभागी झाले होते.


No comments:

Post a Comment