पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याकरिता राज्य शासनाच्या निवड समितीत पालकमंत्री आदिती तटकरे यांची निवड - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 12, 2020

पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याकरिता राज्य शासनाच्या निवड समितीत पालकमंत्री आदिती तटकरे यांची निवड

पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याकरिता राज्य शासनाच्या निवड समितीत पालकमंत्री आदिती तटकरे यांची निवड

अमृता कदम-

महाराष्ट्र  मिरर टीम


वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची  दि.26 जानेवारी 2021 रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्याकरिता राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीत राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची निवड झाली आहे. 

       पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचीदेखील या समितीचे सदस्य  म्हणून निवड करण्यात आली आहे.

      शासनाकडे पद्म पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करून योग्य मान्यवरांच्या नावांची शिफारस ही समिती केंद्र शासनाकडे करील.

No comments:

Post a Comment