नामदार बच्चू कडू भाजी खरेदी करतात तेंव्हा!!!! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 24, 2020

नामदार बच्चू कडू भाजी खरेदी करतात तेंव्हा!!!!

नामदार बच्चू कडू भाजी खरेदी करतात तेंव्हा!!!!

सागर चव्हाण-तासगाव(सांगली)


मंत्रिपदाचा कुठल्या ही प्रकारचा  रुबाब व ताम जाम न बाळगता आजही सर्वसामान्यांप्रती व शेतकऱ्यां प्रती असलेली तळमळ  नामदार  बच्चू कडु यांच्यात आजही तेवढ्याच प्रकर्षाने जाणवते.शेतकऱ्यांच्या शेंगा विकणार्‍या मुलांमध्ये ही छोटा उद्योजक पाहणार्‍या नामदार बच्चू कडु  यांची शेतकऱ्यांविषयी असणारी तळमळ प्रखरतेने दिसते.कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे..मतदार संघातील दौर्‍या दरम्यान रोडच्या कडेला  दोन छोट्या शेतकर्‍यांच्या मुलांना शेंगा विकतांना ,त्यांनी पाहिले. नामदार कडू यांनी तात्काळ थांबून आपुलकीने त्यांची चौकशी केली. तेवढ्या शेंगा विकण्यासाठी संपूर्ण दिवस लागणार ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. क्षणाचाही विचार न करता  संपूर्ण शेंगा त्यांनी त्याच्याकडून खरेदी केल्या. तसेच त्या मुलांच्या घरच्यांची व लॉकडाऊनच्या काळातील त्यां मुलांच्या अभ्यासाचीही आपुलकीने चौकशीही केली.


शेवटी मंत्रिपदाचा कुठलाही प्रकारचा रुबाब  व ताम जाम न ठेवता आजही सर्वसामान्यांविषयी व शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ नामदार बच्चु भाऊंच्यामध्ये आजही तेवढ्याच प्रकर्षाने दिसते.

No comments:

Post a Comment