शिवनेरी गोविंदा पथकाने अनोख्या पदधतीने दंहीहंडी साजरी करुन जपली सामाजिक बांधिलकी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 12, 2020

शिवनेरी गोविंदा पथकाने अनोख्या पदधतीने दंहीहंडी साजरी करुन जपली सामाजिक बांधिलकी

 


शिवनेरी गोविंदा पथकाने अनोख्या पदधतीने दंहीहंडी साजरी करुन जपली सामाजिक बांधिलकी


सुधीर पाटील -सांगली


तासगांव मधील शिवनेरी गोविंदा पथकाने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दहीहंडी रदद करुन तासगांव शहरामध्ये कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी औषध फवारणी करण्याचा निर्णय घेऊन शक्य तेवढी समाजसेवा करत राहण्याचा निर्णय घेणेत आला होता त्यानुसार तासगांव मधील विविध शासकीय कार्यालय तसेच विविध ठिकाणी औषध फवारणी करुन वेगळया प्रकारे दंहीहंडीचा सण साजरा केला


शिवनेरी गोविंदा पथक हे पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेले गोविंदा पथक आहे.  मंडळातील प्रत्येक गोविंदा हा श्रीकृष्ण जन्माष्टमी या सणाची आतुरतेने वाट पाहात असतो.  सदयस्थितीला कोरोना या रोगाच्या प्रादुर्भाव मोठया प्रमाणात असलेमुळे मंडळातील सर्व कार्यकर्ते यांनी सामजिक हेतून तासगांव शहातील ढवळवेस, सोमवार पेठ, दाणे गल्ली, मुस्लिम मोहल्ला, माळी गल्ली, भवानी गल्ली, सिध्देश्वर रोड , एस.टी.स्टॅण्ड परिसर , दत्तमाळ एम.एस.ई.बी. , सम्राट अशोक नगर, वरचे गल्ली तसेच तासगांव शहरातील विविध शासकीय कार्यालय, पोलिस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालय, एम.एस.ई.बी. यासह विविध ठिकाणी औषध फवारणी ख-या अर्थाने  गोपाळकाला सण साजरा करण्यात आला.  यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव , उपाध्यक्ष शितल पाटील व मंडळातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.  सदरचा


हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून तासगांव शहरातील नागरीकांनी शिवनेरीच्या गोविंदानी गोपाळ काला हा सण वेगळया प्रकारे साजरा केलेमुळे मंडळाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment