Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

११सप्टेंबर ला एनयूजे इंडियाचे राष्ट्रीय अधिवेशन



११सप्टेंबर ला एनयूजे इंडियाचे राष्ट्रीय अधिवेशन


 शंभरहून अधिक शहरांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होणार

बेरोजगार पत्रकारांना आर्थिक मदतीची मागणी



 महाराष्ट्र मिरर टीम-नवी दिल्ली, 


११ सप्टेंबर २०२० रोजी इंटरनॅशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् शी संलग्न असलेल्या नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स-इंडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनात दोन हजाराहून अधिक पत्रकार सहभागी होणार.  संमेलनात माध्यम जगताच्या प्रमुख समस्यांवर विचार केला जाईल. 

 रविवारी एनयूजे इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या एक दिवसीय बैठकीत कोरोना काळातील वृत्तपत्रे व वाहिन्यांमधून काढलेल्या पत्रकारांना केंद्र व राज्य सरकारांकडून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.  मोठ्या संख्येने पत्रकारांसमोर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.  खराब आर्थिक स्थितीमुळे पत्रकारांना आत्महत्या करावी लागली.त्यामुळे त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी बैठकीत झाली 


 एनयूजे इंडियाचे अध्यक्ष रासबिहारी यांचे अध्यक्षतेखाली आणि महासचिव प्रसन्ना मोहंती यांच्या संचालनाखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीचे   आयोजन केले गेले. यात कोषाध्यक्ष डाँ अरविंद सिंह,उपाध्यक्ष भूपेश गोस्वामी (गुवाहाटी)पुण्यमराजू(विजयवाडा),प्रदीप तिवारी(भोपाल),रामचंद्र कनौजिया(हरिद्वार), सय्यद जुनैद (श्रीनगर), सचिव कमलकांत उपमन्यु (मथुरा), पंकज सोनी (जयपूर), कंडास्वामी (चेन्नई), प्रशांत चक्रवर्ती (अगरतला) आदीं सहभागी झाले होते.

 सर्व राज्यांच्या राजधानीसह प्रमुख शहरांमध्ये व्हिडियो काँन्फरन्सव्दारा सहभाग घेतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.


 एनयूजेचे माजी अध्यक्ष प्रज्ञानंद चौधरी, माजी सरचिटणीस शिवकुमार अग्रवाल, दिल्ली जर्नालिस्टस् असोसिएशनचे अध्यक्ष राकेश थपलियाल, सरचिटणीस केपी मलिक, कोषाध्यक्ष नरेश गुप्ता, यूपी जर्नालिस्टस् असोसिएशनचे अध्यक्ष रतन दीक्षित, सरचिटणीस अशोक अग्निहोत्री, माजी कोषाध्यक्ष अनिल अग्रवाल, उत्तराखंड युनिटचे अध्यक्ष.  बीडी शर्मा, जम्मू काश्मीर जर्नालिस्ट्स युनियनचे अध्यक्ष सय्यद जुनैद, सरचिटणीस सय्यद बुखारी, हिमाचल प्रदेश युनियन आँफ जर्नालिस्टस् चे अध्यक्ष रणेश राणा, हरियाणा मीडिया युनियनचे संयोजक बलराम शर्मा, सहसंयोजक विपुल कौशिक, एनयूजे महाराष्ट्र च्या अध्यक्ष शीतल करदेकर, जर्नालिस्टस् असोसिएशन ऑफ मध्य प्रदेशचे अध्यक्ष  खिलवान चंद्रकर, जर्नालिस्टस् असोसिएशन ऑफ राजस्थानचे अध्यक्ष राकेश शर्मा, झारखंड युनियन जर्नलिस्टसचे अध्यक्ष रजत कुमार गुप्ता, कार्यकारी अध्यक्ष राजीव नयनम, वेस्ट बंगाल युनियनआँफ  जर्नालिस्टस् चे महासचिव दीपक राय, एनयूजे तमिळनाडूचे अध्यक्ष मुरुगनंदन, सरचिटणीस कृष्ण वेनी, जर्नालिस्टस् असोसिएशन आँफ आंध्र प्रदेशचे अध्यक्ष पुण्यम राजू, सरचिटणीस युगंधर रेड्डी, तेलंगाना युनिटचे अध्यक्ष ए. सूर्यप्रकाश राव आदीं राज्यांतील  पदाधिकाऱ्यांनी विविध शहरांमध्ये राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्याविषयी माहिती दिली.


  रासबिहारी यांनी सांगितले की, या संमेलनात कोरोना कालावधीत ज्यांना ताब्यात घेण्यात आले होते आणि त्यांना कामावरून काढण्यात आले होते आदी पत्रकारांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल.  त्याचबरोबर पत्रकार संरक्षण कायदा तयार करण्याची मागणी, मिडिया कौन्सिल आणि मीडिया कमिशन तयार करण्याची मागणी जोरदारपणे उपस्थित केली जाईल.  

या बैठकीत पत्रकारांविरोधात बनावट खटल्यांच्या आधारे  केलेल्या अटकेविरूद्ध आवाज उठविला गेला. 

 आर्थिक दुर्बल वृत्तपत्रांना केंद्र सरकारकडून मदत देण्याचा भागणी केलीजाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.


 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies