माथेरानच्या अमन लॉज ते काळोखीचा चढाव होणार कमी - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 24, 2020

माथेरानच्या अमन लॉज ते काळोखीचा चढाव होणार कमी

 माथेरानच्या अमन लॉज ते काळोखीचा चढाव होणार कमी


 अधिकारी वर्गांना धरले धारेवर  


  राजकीय झेंडा बाजूला ठेवत गावाच्या विकासाला प्राधान्य  


चंद्रकांत सुतार माथेरानमाथेरानच्या विविध विकास कामांसाठी  भरीव निधी एमएमआरडीएच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे परंतु या निधीचा  योग्य नियोजन न करता  त्याचा  कामे होत असल्याने 

 स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दस्तुरी नाक्यापासून ( अमन लॉज) रेल्वे स्टेशन समोरून सुरू करण्यात आलेले काम खूपच घाईगडबडीत करण्यासाठी ठेकेदारांची खूपच धावपळ उडाली आहे. त्यामुळे होत असलेल्या कामांमुळे रस्ता अरुंद झालेला आहे.  अमन लॉज ते काळोखी पर्यंतचा चढाव भागातील चढावाचे काम तसेच ठेऊन ग्याबियन वॉल मुळे रस्ता खूपच अरुंद करण्यात आला आहे. गरज नसताना सुध्दा या वॉल बांधण्यात आलेल्या आहेत. रस्त्याच्या बाजूला जागा उपलब्ध असताना सुध्दा या वॉल मुळे अरुंद रस्त्यावरून हातरीक्षा आणि घोडेवाल्याना आगामी काळात व्यवसाय करताना खूपच त्रासदायक बनणार आहे. या  सुरू असलेल्या चुकीच्या कामांबाबत नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी सूचना वजा तक्रार  संबंधित कार्यलयात केल्या होत्या, नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी ही  काळोखी येथील चढ कमी करण्याबाबत सूचना केल्या होत्या परंतु ज्या प्रमाणे काम सुरू होते त्या मुळे अनेक शंखा तक्रारी निर्माण झाल्याने  आज एम एम आर डी ए चे  कार्यकरर्णी अभियंता अरविंद धाबे, डेपोटी इंजिनियर किशोर टेम्बुरलीकर,


 कन्सल्टन्स डायरेक्ट, जियो टेक्नॉलॉजी एक्सपर्ट, अँटी कन्सल्टन्स कर्मचारी व स्वता कॉन्ट्रॅक्टर हे सर्व अधिकारी वर्ग  माथेरानला आले असता माथेरान च्या नगराध्यक्ष प्रेरणा सावन्त  नगरसेवक शिवाजी शिंदे  मनोज खेडकर  सुनील शिंदे , रिक्षा संघटनेचे  नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे,गणपत राजाने, किशोर सोनवणे, संतोष शिंदे, चंद्रकांत चावरे, अश्वपालक राकेश कोकळे  संदीप शिंदे नागरिक यांनी संबंधित अधीकारी वर्गाला  काळोखी चढावा  कमी करण्याबाबत आग्रही राहिले,  मनोज खेडकर शिवाजी शिंदे यांनी काळोखी चढावा बाबत चुकीच्या तांत्रिक गोष्टी बाबत अधिकारीवर्गाला धारेवर धरत अनेक महत्वपूर्ण सूचना केल्या, नगराध्यक्ष प्रेरणा सावन्त, मनोज खेडकर, शिवाजी शिंदे, सुनील शिंदे, संदीप शिंदे, राकेश कोकळे, , यांनी  इ रिक्षा महत्वची असली तरी पाहिले प्राधान्य अमन लॉज ते  काळोखी हा चढाव कमी करण्यावर आज एम एम आर डी च्या सर्व अधिकारी वर्गासमोर ठाम भूमिका घेतल्याने, अधिकारी वर्ग ने त्यास होकार देत शक्य  ठेवढा  जास्तीत जास्त चढाव कमी करण्याचा पर्यन्त करू असे आश्वासन दिले. ४६ कोटींचा निधी दस्तुरी ते पांडे रोड साठी खर्च करण्यात येनार आहे. आहे दस्तुरी( काळोखी) चा चढाव सद्यस्थितीत हातगाड्या , व रिक्षा ओढणाऱ्या स्थानिक युवकांना रक्ताचे पाणी करून ही कष्टदायक कामे करावी लागत आहे,

दस्तुरी काळोखीतील १०० मीटर रस्त्याचा चढ कमी झाला तरच माथेरानच्या विकासाला गती मिळणार आहे

----------------------------------------

लॉक डाऊन मुळे सध्या माथेरानचे बरेच तरुण हात गाडी ओढून घर चालवीत आहेत  दस्तुरी ते काळोखी हा चढ जीवघेणा आहे रक्ताचे पाणी करतो काही झाले तरी चढ कमी करा अश्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहे.

विजेन्द्र देशमुख- स्थनिक तरुण

No comments:

Post a Comment