कॅप्टन निधी भोसले यांचा नवकोकण एज्युकेशन सोसायटीकडून सत्कार - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 28, 2020

कॅप्टन निधी भोसले यांचा नवकोकण एज्युकेशन सोसायटीकडून सत्कार

 कॅप्टन निधी भोसले यांचा नवकोकण एज्युकेशन सोसायटीकडून सत्कार..

ओंकार रेळेकर-चिपळूणचिपळूणच्या नवकोकण एज्युकेशन सोसायटी तर्फे डि.बी.जे. महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी चिपळूणची पहिली सुकन्या कॅप्टन निधी मंगेश भोसले यांचा छोटेखानी सत्कार चेअरमन मंगेश उर्फ बाबूशेठ तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. कॅप्टन निधीकडून सर्व विद्यार्थी भविष्यात निश्चित प्रेरणा घेतील व कॅप्टन निधी प्रमाणे वेगवेगळ्या शैक्षणिक वाटा निवडतील, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी सचिव माधव चितळे, जेष्ठ सदस्य प्रकाश जोशी, सुचय रेडीज, रामशेठ रेडीज, अतुल चितळे, अविनाश जोशी, लियाकत दलवाई, निलेश भूरण, नित्यानंद भागवत, डॉ.शेखर मेहेंदळे, सौ.वेदा गुढेकर, प्राचार्य डॉ.श्रीकृष्ण बाळ, एम.बी.ए. महाविद्यालयाच्या संचालिका अनघा गोखले, नगरसेवक परिमल भोसले आदी मान्यवर हजर होते.

No comments:

Post a Comment