तनाळी येथे गणेश विसर्जन घाटाचे उदघाटन .. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 28, 2020

तनाळी येथे गणेश विसर्जन घाटाचे उदघाटन ..

 तनाळी येथे गणेश विसर्जन घाटाचे उदघाटन ..                        

ओंकार रेळेकर-चिपळूण
तालुक्यातील तनाळी नवलेवाडी येथे पंचायत समिती सेस फंडातून बांधण्यात आलेल्या गणपती विसर्जन घाटाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या सौ अनुजा जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावचे उपसरपंच जयेश बोबले, माजी उपसरपंच श्री डिंगणकर, तनाळी गावचे माजी अध्यक्ष काशिनाथ शेठ बोंबले, तनाळी चे शिवसेना शाखाप्रमुख सुधाकर राव जाधव, माजी सभापती पप्या चव्हाण व वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वाडी च्या वतीने सौ अनुजा जितेंद्र चव्हाण यांचे आभार मानले गेले व गावाच्या वतीने अनुजा जितेंद्र चव्हाण यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच जयेश बोबले यांनी केले

No comments:

Post a Comment