सबिहा फाऊंडेशनच्या कार्यालयाचा शुभारंभ - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 21, 2020

सबिहा फाऊंडेशनच्या कार्यालयाचा शुभारंभ

 सबिहा फाऊंडेशनच्या कार्यालयाचा शुभारंभ

ओंकार रेळेकर-चिपळूणसामाजिक कार्यात अग्रेसर असलेले युवा उद्योजक श्री. मुबिनभाई खोत यांच्या सबिहा फाऊंडेशनच्या गुहागर नाका येथील कार्यालयाचे उदघाटन नुकतेच  अबुबकर खोत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुबिनभाई खोत यांचे मोठे बंधू प्रसिद्ध उद्योजक नासिरभाई खोत, जफरउल्ला खान सरगुरो, मसूद खान सरगुरो, अब्दुल हमीद खान सरगुरो, नवेद खोत, डॉ. अय्याज खोत, जावेद मुल्ला सर, इब्राहिम शेखनाग, अरुण साठे, तबरेज दळवी, डॉ. मंदार चांदिवडे, बंटी सावंत, कासम दलवाई, हनिफ पारकर व खोत कुटुंबियांचे नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतक उपस्थित होते. 

        सबिहा फाऊंडेशनच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत गेली अनेक वर्षे होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत, गरजू रुग्णांना आर्थिक मदत यासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मुबिनभाई खोत यांनी नुकतेच आपले चुलते (काका) यांच्या हस्ते सबिहा फाऊंडेशनच्या कार्यालयाचा शुभारंभ केला. यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.  खोत यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment