मोठ्या शहरांमध्ये हेल्मेट सक्ती नाही मात्र साताऱ्यात का? आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा सवाल - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Sunday, August 2, 2020

मोठ्या शहरांमध्ये हेल्मेट सक्ती नाही मात्र साताऱ्यात का? आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा सवाल

 मोठ्या शहरांमध्ये हेल्मेट सक्ती नाही मात्र साताऱ्यात का? आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा सवाल


 मिलिंद लोहार -सातारा

 प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे की लॉक डाऊन मध्ये  शिथीलता देत जिल्हा प्रशासनाने हेल्मेट सक्तीचा नवा निकष काढला आहे पुण्यासारख्या शहरात हेल्मेट सक्ती होऊ शकली नाही हेल्मेट सक्तीच्या विरोधात वारंवार आंदोलने झाली आहेत आणि प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे कोल्हापूर सांगली पुणे यांचे महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात हेल्मेट सक्ती नाही मात्र सातारा जिल्हा प्रशासनाने अचानक निर्णय का घेतला हे अनाकलनीय कोडे आहे लॉक डाऊन मध्ये  शिथीलता दिल्यानंतर मात्र त्याचबरोबर दुचाकी चालकास हेल्मेट सक्ती लागू केली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हेल्मेट सक्ती लागू केली आहे कोरोनापासून बचाव करण्यासाठी हेल्मेट घातले तर कोरोनापासून बचाव होईल किंवा नाही असे थोडी आहे. कोरोनापासून बचावासाठी मास्कची गरज आहे परंतु हेल्मेटची सक्ती चुकीची आहे .त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लोकांच्या अडचणी आणि जनभावना यांचा विचार करून कुठेही हेल्मेट सक्ती करू नये अशी मागणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment