मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर टँकरच्या भीषण अपघातात दोघे ठार - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 18, 2020

मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर टँकरच्या भीषण अपघातात दोघे ठार

 मुंबई -पुणे एक्सप्रेस वे वर टँकरच्या भीषण अपघातात दोघे ठार

महाराष्ट्र मिरर टीम -खोपोली


दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास  पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वरील मुंबई  लेनवर भातान बोगदा जवळ पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव येणाऱ्या दुधाच्या टँकरने पाठी मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण ठार झालेत.

  दुधाच्या टँकरचा ड्रायव्हर  हाजी फुला वय 43 रा . वाराणसी उत्तर प्रदेश व सहप्रवासी विजय निवृत्ती मरगज वय 41 रा. विले पार्ले ईस्ट मुंबई हे दोघे  जागीच ठार झालेत.


दोन्ही मयतास आयआरबी रस्ता सुरक्षा व वाहतूक नियंत्रण पथकाने चौक ग्रामीण रुग्णालय येथे नेले .

No comments:

Post a Comment