Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

200 लोकांचे प्राण वाचावणाऱ्या महेश साबळे यांचा आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सत्कार


200 लोकांचे प्राण वाचावणाऱ्या महेश साबळे यांचा आ.शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सत्कार

 राष्ट्रपती पदकामुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढला: आ . शिवेंद्रसिंहराजे

प्रतीक मिसाळ-सातारा



सातारा ही शूरवीरांची भूमी आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पराक्रमी भूमीत जन्मलेले हजारो वीर देश रक्षणासाठी प्राणांची बाजी लावत आहेत . याच भूमीतील महेश साबळे या युवकाने लोअर परळ , मुंबई येथील कमला मिलला लागलेल्या आगीच्या घटनेत २०० जणांचे प्राण वाचविले . याबद्दल साबळे यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान झाला साबळे यांच्या धाडसामुळे सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढला , असे गौरवोद्गार आ श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी येथे काढले . सातारा तालुक्यातील पिलाणी ( खालची ) या गावचे सुपुत्र महेश साबळे यांनी लोअर परळ येथील कमला मिलला लागलेल्या भीषण आगीच्याप्रसंगी धाडस दाखवून २०० जणांचे प्राण वाचविले . त्यामुळे संपुर्ण भारतातुन एकमेव राष्ट्रपती सर्वोत्तम जिवन रक्षक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले . या धाडसाबद्दल आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते साबळे यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी ते बोलत होते . यावेळी बाजार समितीचे सभापती विक्रम पवार शेंद्रे गटाचे संतोष कदम , शेळकेवाडीचे सरपंच संतोष शेळके , अशोक कदम फौजी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते . दरम्यान , कौंदणी गावचे सुपुत्र दिलीपराव यादव यांची भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष म्हणुन निवड झाली , त्याबद्दल आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांचा सत्कार केला .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies