बारवी प्रकल्पग्रस्त तरूणांना मिळणार शासकीय नोकरी
सुधाकर वाघ-मुरबाड
ठाणे जिल्ह्यातील बारवी प्रकल्पग्रस्त 209 तरुणांना एकाच वेळी शासकीय सेवेत नोकरीच्या माध्यमातून सामावून घेतल्याने प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात येणार असल्याने आपल्या न्याय हक्का साठी संघर्ष करणाऱ्या बारवी प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसुन येत आहे.
मुरबाड येथील कार्यक्रमात नोकरीसाठी निवड झालेल्या तरूणांची नावे जाहीर करून 29 सप्टेबर रोजी 209 जणांपैकी
5 तरूणांना मंत्रालयात नेऊन नोकरीचे पत्र दिले जाणार असून उर्वरीत तरूणांना मुरबाड येथे नियुक्ती पत्र दिले जाणार असल्याची माहीती आमदार किसन कथोरे यांनी या कार्यक्रमात दिली. या वेळी नायब तहसीलदार बंडू जाधव, तालुका अध्यक्ष जयंत सुर्यराव, जिल्हा संघटक सरचिटणीस नितीन मोहोपे, पं.स.चे सभापती श्रीकांत धुमाळ, रामभाऊ दळवी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, प्रकल्प पिडीत संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोईर, उपाध्यक्ष हरेश पुरोहीत, अनंत कथोरे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांना आपली भूमी व घर सोडताना काय यातना होतात याची जाण मी स्वत: प्रकल्पग्रस्त असल्याने अनुभवली आहे. यामुळेच एकही प्रकल्प पिडीत कुटूंब न्याय मिळण्यापासून वंचित राहणारे नाही ही खूणगाठ बांधूनच प्रयत्न सूरू केले. आणि हे प्रयत्न भाजपाचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा मुख्यमंत्री असल्याने हे शक्य झाले हे उपस्थितांना आवर्जून सांगीतले. मिळालेली नोकरी टिकवा, कसोटीने काम करा असाही सल्ला कथोरे यांनी तरूणांना दिला. नोकरी नको पाहीजे असल्यास 10 लाख रूपये एमआयडीसीच्या वतीने दिले जाणार आहेत. पण पैशाच्या मोहाला बळी पडून नोकरी सोडू नका असाही सल्ला कथोरे यांनी दिला.