कोरोना संकट काळात रुग्णांसाठी देवदूत म्हणून सेवा बजावणाऱ्या डॉ.संतोष दाभोळकर यांचा झाला सन्मान - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, September 18, 2020

कोरोना संकट काळात रुग्णांसाठी देवदूत म्हणून सेवा बजावणाऱ्या डॉ.संतोष दाभोळकर यांचा झाला सन्मान

कोरोना संकट काळात रुग्णांसाठी देवदूत म्हणून सेवा बजावणाऱ्या डॉ.संतोष दाभोळकर यांचा झाला सन्मान


डॉ .दाभोळकर खरे कोविड योध्दा : इम्रान कोंडकरी

  ओंकार रेळेकर-चिपळूण

      कोरोना संकट काळात डॉक्टर संतोष दाभोळकर येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना धिर देण्याचे महान कार्य करीत आहेत,स्वतःच्या आरोग्याची फार  काळजी न घेता दाभोळकर  सतत रुग्णाच्या सेवेत हजर आहेत ते रुग्णांसाठी खरे कोविड योध्दा असल्याची प्रतिक्रिया मर्चन्ड नेव्ही अधिकारी  जिवलग ग्रुपचे  इम्रान कोंडकरी यांनी व्यक्त केली,


कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रादूर्भाव मुळे सर्वत्र कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आहे,अशा काळात तत्परतेने सेवा बजावत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुरवातीपासूनच डॉ.दाभोळकर अविरतपणे वैद्यकीय सेवा बजावत आहेत,या काळात  दरवर्षी प्रमाणे नियमित येणाऱ्या आजरपणावर  उपचार घेण्या करीता येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची हसत खेळत आपुलकीने विचारणा करून   रुग्णांमधील मानसिक तणाव कमी करून मनातील कोरोना रोगाची भिती काढण्याचे महान कार्य डॉ .दाभोळकर  करीत  आहेत,करोना महामारी सारख्या संकटात आपुलकीची योग्य सेवा देऊन लोकांना महामारी च्या संकटातुन बाहेर काढण्याचे काम करत एक आदर्श निर्माण केल्या मुळे जिवलग ग्रूप, चिपळूण या सामाजिक कार्य करणाऱ्या  संस्थेतर्फे आपत्कालीन कोरोना प्रादुर्भावा च्या परिस्थितीत उत्कृष्ट वैद्यकीय सेवा केल्याबद्दल डॉ. संतोष दाभोळकर यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले ,या वेळी मर्चन्ड  नेव्ही अधिकारी इम्रान कोंडेकरी ,डॉ. शेखर मेहेंदळे ,हर्षद अभ्यंकर ,समीर काझी ,बी.डी.शिंदे,तुषार गगनग्रास ,अमोल कदम,राजेंद्र शिंदे ,योगेश बांडागळे आदी मान्यवर उपस्थित होते ,या वेळी दाभोळकर यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले,

No comments:

Post a Comment