शहीद नायक सचिन जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, September 19, 2020

शहीद नायक सचिन जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्य संस्कारशहीद नायक सचिन जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार 

 पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलं अंत्यदर्शन 

प्रतीक मिसाळ-पाटण


सातारा जिल्ह्यातील दुसाळे ता . पाटण येथील शहीद नायक सचिन संभाजी जाधव यांच्यावर शासकीय इतमामात आज संस्कार करण्यात आले यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली . शासनाच्या वतीने राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील , गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली . यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते , पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील , पाटणचे तहसीलदार समीर यादव यांनीही आदरांजली वाहिली . सातारा जिल्ह्यातील 111 इंजिनियर रेजिमेंटचे नायक सचिन संभाजी जाधव यांना दि . 16 सप्टेंबर 2020 रोजी सैन्यामध्ये सेवा बजावताना वीर मरण प्राप्त झाले होते . दुसाळे गावातून सजवलेल्या गाडीतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ते नियम पाळून ग्रामस्थांनी आपल्या शूर भूमिपुत्राचे अतिशय शोकाकुल वातावरणात शेवटचे दर्शन घेतले .

No comments:

Post a Comment