कोरोना योद्धा चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव पुन्हा जनसेवेसाठी रुजू - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 7, 2020

कोरोना योद्धा चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव पुन्हा जनसेवेसाठी रुजू

 कोरोना योद्धा चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव पुन्हा जनसेवेसाठी रुजू


ओंकार रेळेकर-चिपळूणचिपळूणच्या कोरोना योद्धा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात करीत पुन्हा कोरोनाच्या लढाईसाठी सज्ज झाल्या आहेत. सुरुवातीपासून कोरोनाच्या संकटात अग्रेसरपणे कार्यरत असलेल्या चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. मात्र, आरोग्य विभागाने तात्काळ सतर्कता दाखवित तर डॉ. ज्योती यादव यांनी मनाचा कणखरपणा दाखवित व योग्य औषधोपचार घेत कोरोनावर यशस्वीपणे मात करीत पुन्हा त्या जनसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. बरे झाल्यानंतर घरी कशा थांबतील? डॉ. ज्योती यादव! काही दिवसानंतर आरोग्य विभागात दाखल होत अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढण्यास मदत होणार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

No comments:

Post a Comment