खालापूरातील आरोग्य यंञणेचा मनसेकङून पंचनामा. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, September 3, 2020

खालापूरातील आरोग्य यंञणेचा मनसेकङून पंचनामा.

 खालापूरातील आरोग्य यंञणेचा मनसेकङून पंचनामा.

  कारभार सुधारा अन्यथा आंदोलन, मनसेने दिला इशारा, 

दत्ता शेडगे-खालापूर   तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या  प्राथमिक आरोग्य केंद्रातील ढिसाळ आरोग्य सेवा सुधारा अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ    असा इशारा खालापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने  प्रशासनाला देऊन आज वरिष्ठ गटविकास अधिकारी संजय भोये  यांना  निवेदन  देण्यात आले 

   .तालुक्याच्या ठिकाणी असलेले  खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत तक्रारीचा पाऊस पङत असताना देखील कारवाई होत नसल्याने नागरिक वैतागले  असून कोरोनाचे संकट असताना देखील ङाॅक्टर गैरहजर असणे,बाहेरून औषध आणण्यास सांगणे, आरोग्य केंद्रात अस्वच्छता,रूग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसणे यासारख्या समस्याना नागरिकाना तोंङ द्यावे लागत होते.काही दिवसापूर्वी आदिवासी गर्भवती महिलेला खालापूर आरोग्य केंद्रात ङाॅक्टर नसल्याने वेळेत उपचार  न मिळाल्याने जीव गमवावा लागला होता.

  याची दखल घेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले, व आरोग्य यंत्रणेचा कारभार सुधारा अन्यथा आंदोलन करू असा इशारा मनसेकडून  देण्यात आला 

    यावेळीं  मनसे खालापूर तालुकाध्यक्ष सचिन कर्णूक,खालापूर शहर अध्यक्ष कौस्तुभ जोशी,महिला तालुका अध्यक्षा  हेमलता चिंबुळकर ,शहर उपाध्यक्ष प्रदीप लोते,अभिषेक कानडे, स्वप्नील फराट, अमोल रसाळ ,मंदार जोशी,अजिंक्य चव्हाण,हितेश मिरवणकर,रोहन शिंदे,नयन धुमाळ,नरेंद्र यादव,कल्पेश नगरकर ,अभिजित घरत आदी उपस्थित होते 

   

No comments:

Post a Comment