Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पर्यटन स्थळ माथेरान झालं सुरू, स्थानिक भारावले

 पर्यटन स्थळ माथेरान झालं सुरू,
स्थानिक भारावले

चंद्रकांत सुतार--माथेरान

माथेरानचे जनजीवन हे पर्यटनावर अवलंबून असल्याने येथे कोरोनासारखे महाभयंकर संकट कोसळल्याने मागील मार्च महिन्यापासून पुर्णतः लॉकडाऊन करून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती,  त्यामुळे येथील सर्व नागरीकवर्ग  चिंतातूर होते, उदरनिर्वाहसाठी काम व्यवसाय, महत्वचे परंतु माथेरान हे पर्यटन स्थळ असल्याने येथील पर्यटकचं  येथील उदरनिर्वाह चे साधन आहे. येथे कोणत्याही प्रकारे इतर व्यावसायिक साधन नाही, त्यामुळे कधी हे लॉकडाऊन संपते आणि कधी आपले  पर्यटन सुरू होते ह्या अधिररतेने सर्व माथेरानकर होते आणि सर्व माथेरानकरांच्या संयमाची परीक्षेचे फलश्रुतीची  बातमी आली आदेश आले की माथेरान उद्यापासून सुरू होत आहे,  बस ह्या एका मेसेज ने   सर्व माथेरानकर  भारावून गेले , सोशल मीडियावर तर आनंदाचा पुर वाहत होता, शब्दात वर्णन कसे करावे अशा अवस्थेत नागरिक, महिला वर्ग आहे , सर्वत्र आनंदी आनंद प्रसन्नता जाणवतेय आजचा दिवस  म्हणजे गणपती बाप्पाने घरी जाताना माथेरान कराना दिलेला सर्वात मोठा आशिर्वादच, माथेरानकरांच्या ह्या आनंदात 22 पर्यटकांनी माथेरानला येऊन आनंद दुगुणीत केला, हा सर्व आनंदाचा सोहळा ध्यानी मनी साजरा करत असताना  मात्र हलगर्जीपणा, उतावळे न होता सर्व नागरिकांनी कोरोना बाबतीत स्वता बरोबर  पर्यटकांची गावाची काळजी घेतली पाहिजे, 5 महिने जेवढ्या संयमाने धीराने आपण माथेरान जपले , त्याच माथेरानमध्ये पर्यटक रहदारी वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला नको याची आपण प्रत्येक व्यावसायिक, नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, मागील 6 महिन्यात कोरोनामुळे प्रत्येकाने  आयुष्यतील एक धडा शिकला आहे,  त्यामुळे माथेरान सुरू  ही आनंददायी बाब  तरी तो आनंद चिरकाल टिकला पाहिजे याचीच जबाबदारी आपण घेतली.
आज आम्ही माथेरान मा.जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशानुसार सुरू केले आहे,कोरोनाच्या काळात येणाऱ्या पर्यटक  व नागरिकांची काळजी घेणे जरुरी चे आहे त्याअनुषंगाने  नगरपालिका प्रशासन सज्ज आहे. या वेळी माथेरान बाहेरून येणाऱ्या सर्व नागरिक,पर्यटकांचे  प्रवेशद्वाराजवळ टेमप्रेचर , ऑक्सिजन चेक होणार आहे, माक्स  वापरणे बंधनकारक असेल सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यावर दंडात्मक कारवाई होणार आहे , सार्वजनीक ठिकाणी  स्वछता बाबतचे नियम पाळायचे आहेत, माथेरान नव्याने सुरू करायचं आहे केलेले आहे , तरी आपल्या सर्वांचे माथेरान मध्ये स्वागतच असेल


नगराध्यक्ष--प्रेरणा  प्रसाद सावंत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies