Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कामगार आघाडीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र दादर येथे भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या हस्ते फळ वाटप

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कामगार आघाडीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र दादर येथे भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या हस्ते फळ वाटप



ओंकार रेळेकर-चिपळूण



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात १४  सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२० पर्यंत सेवा सप्ताह कार्यक्रम सुरू आहे. चिपळूण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या नेतृत्वाखाली जि. प. गट, व पं स. गणात सेवा सप्ताह कार्यक्रम सुरू आहे. नुकतेच भाजपा कामगार आघाडी तालुका संयोजक गणेश नलावडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र दादर येथे रूग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फळे वाटप  तसेच कोरोना अंतर्गत आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, प्रयोग शाळा वैज्ञानिक, वाहन चालक, स्त्री परिसर, आरोग्य सेविका, आरोग्य  सेवक या कोविड योद्धांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. 


हा कार्यक्रम भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर तसेच भाजपा शिक्षक सेल उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक सोमनाथ सुरवसे  , तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र दादर, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा  सोलवंड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आरोग्य सेवक प्रफुल्ल केळस्कर यांनी आरोग्य केंद्रातील सर्व माहिती दिली. कोविड योद्धांचा तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. व रूग्णांना फळे वाटप करण्यात आली. विनोद भोबस्कर यांनी सर्वांनी काळजी घ्या, मास्क चा वापर करा, गरम पाण्याची वाफ घ्या असे सांगितले. तसेच आरोग्य केंद्रातील सर्व कोविड योद्धांचे तसेच वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. हर्षदा सोलवंड यांचे मनापासून आभार मानले.


या कार्यक्रमाला तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, तालुका उपाध्यक्ष सुरेशराव कदम, तालुका चिटणीस ओंकार बापट, कामगार आघाडी तालुका संयोजक  गणेश नलावडे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष  पांडुरंग शिंदे, अध्यात्मिक समन्वय तालुका संयोजक प्रकाश तांबीटकर, कामगार आघाडी तालुका सह संयोजक सुधिर सुतार, शैलेश लब्धे, प्रविण सुतार,  पाचाड चे युवा कार्यकर्ते शरद तेवरे,  सुनील चिले, वालोटी बुथ अध्यक्ष संदिप पांचाळ, युवा कार्यकर्ते कु. तेजस सुतार तसेच आरोग्य सहाय्यक राजेंद्र मोलाज, आरोग्य सेवक प्रफुल्ल केळस्कर, माधुरी मोहिते, वेदा भूरण, उषा जाधव, श्रध्दा मांडवकर, अर्चना देसाई, अर्चना सुर्वे, प्रियांका शिंदे, स्वाती शिगवण, अजिंक्य सातपुते हे कोविड योद्धे  उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक  प्रफुल्ल केळस्कर तसेच आभार तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies