कोरोना कालावधीत डेंजर झोनमध्ये काम करणा-या एनजीओ ला दानशूर व्यक्तींनी रुग्णांच्या सेवेसाठी दिली वॅगनर गाडी - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Monday, September 21, 2020

कोरोना कालावधीत डेंजर झोनमध्ये काम करणा-या एनजीओ ला दानशूर व्यक्तींनी रुग्णांच्या सेवेसाठी दिली वॅगनर गाडी

 कोरोना कालावधीत डेंजर झोनमध्ये काम करणा-या एनजीओ ला दानशूर व्यक्तींनी रुग्णांच्या सेवेसाठी दिली वॅगनर गाडी


ओंकार रेळेकर-चिपळूण
 गेली सहा महिने कोरोना संक्रमण काळात रत्नागिरी जिल्ह्यात आपला जीव धोक्यात घालून रत्नागिरी येथील संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी या एनजीओ ला चिपळूण चे मर्चंट नेव्ही आॅफीसर इम्रान कोंडकरी आणि असलम मालगुंडकर यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष दिलावर कोंडकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गरीब आणि अडिअडचणीत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना त्यांना ने आण करण्याकरिता एक वॅगनर गाडी भेट दिली. मर्चंट नेव्ही आॅफीसर इम्रान कोंडकरी, असलम मालगुंडकर, कॅप्टन समीर काझी, वसीम कोंडकरी  या चिपळूण च्या दानशूर व्यक्तींनी आपल्या आंबवली [देवरुख] येथील आपले नातेवाईक  मेहबूब मालगुंडकर, कॅप्टन रियाज कोंडकरी,नौशाद कोंडकरी, मकबूल कोंडकरी,फैसल कोंडकरी, शकील कोंडकरी,रियाज शिरगावकर,मुस्तफा शिरगावकर,  यांनी मिळून ही गाडी एनजीओ चे अध्यक्ष दिलावर कोंडकरी उपाध्यक्ष शकील गवाणकर यांचे स्वाधीन केली.

     

आपल्या कामाची दखल चिपळूण आणि देवरुख येथील आंबवली गावातील दानशूर व्यक्तींनी घेतल्याबद्दल दिलावर कोंडकरी यांनी आभार मानून ही गाडी रुग्णांच्या सेवेस सदैव तत्पर असेल असे सांगितले .दानशूर नागरिकांनी केलेले सहकार्य हे आम्हाला भावी काळात निश्चितच बळ देणारे आहे.आमचे पुढील ध्यैय एक रुग्णवाहिका असून यासाठी ही निधी संकलन करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन ही अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांनी केले.

No comments:

Post a Comment