Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉरंटइन सेंटर मध्ये महिला सुरक्षिततेचि जबाबदारी स्वीकारण्याची गरज -चित्रा वाघ

 


माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॉरंटइन सेंटर मध्ये महिला सुरक्षिततेचि जबाबदारी स्वीकारण्याची गरज -चित्रा वाघ


अजून किती महिलांवर अत्याचार झाल्यावर सरकार नियमावली जाहीर करणार


 मिलिंद लोहार-पुणे

पुणे कोविड केअर सेंटरचा कारभार पुन्हा  एकदा चव्हाट्यावर आला आहे एक 33 वर्षीय कोरोना बाधित महिला गायब झाल्याने पुणे शहरात एकच खळबळ ससून हॉस्पिटलवाले म्हणतात महिला सापडत नाही कोविड सेंटरवाले म्हणतात डिस्चार्ग केला नक्की चाललेय काय ?सापडत नसलेली महिला मनोरुग्ण असली तरी गेली कुठे हे अनुत्तरितच आहे


पुण्याच्या दवाखान्यात कोविड सेंटर मध्ये  महिला असुरक्षित. पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा चर्चेत आला असून वारंवार विचारून सुद्धा प्रशासन दाद देत नाही असा आरोप या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे 
जोपर्यंत रुग्णालय प्रशासन मुलीची माहिती देत नाही तोपर्यंत रुग्णालयबाहेर आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे या महिलेच्या आईने सांगितले तसेच याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे
संबंधित महिला पतीपासून वेगळी राहते तसेच ती मनोरुग्ण असून येरवाड्यात ती आईसोबत राहत होती येरावड्यातील मनोरुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते कोरोनाची बाधा झाल्यामुळे तिला 29 ऑगस्ट रोजी ससून रुग्णालयात दाखल केले होते तेथून त्याच दिवशी तिला जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेेथे रुग्णाच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने रागिणी गमरे या महिलेची आई घरी निघून गेल्या त्या नंतर13 सप्टेंबर ला कॉरंटाईन कालावधी समाप्त होत असल्यान 12सप्टेंबर ला परत जम्बो कोविड सेंटर(रुग्णालयात) मध्ये विचारपूस करण्यास गेले असता उद्या येऊन तुमच्या मुलीला घेऊन जा असे सांगण्यात आले त्यामुळे रागिणी गमरे मुलीची आई 13 सप्टेंबर ला पुन्हा रुग्णालयात गेल्या त्यावेळेस विचित्र उत्तर मिळाले तुमची मुलगी सापडत नसल्याचे सांगण्यात आले सापडली की तुम्हाला कळवू असे सांगून परत पाठवण्यात आले 
मात्र मुलीची आई रागिणी गमरे 
या त्याच रात्री नातेवाईकांसोबत
जम्बो रुग्णालयात गेल्या असता तुमच्या मुलीला चार दिवसापूर्वीच
डिस्चार्ग दिल्याचे तेेथील डॉक्टरांनी सांगितले नातेवाईकांनी
संपूर्ण पुणे शहरात शोधाशोध केली असता महिला सापडली नाही
म्हणून रागिणी गमरे महिलेच्या आईने शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे मुलगी हरवल्याची तक्रार दिली परंतु अद्याप तिचा शोध लागला नाही
भाजपच्या नेत्या चित्रा वाध यांनी कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळेस त्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कॉरनटाईन सेंटर मध्ये महिला असुरक्षिततेची
जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे अजून किती महिलांवर अत्याचार झाल्यावर सरकार नियमावली जाहीर करणार असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय.अशी माहिती त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिली आहे.


परंतु यातून असे स्पष्ट होते की पुण्यातील महिला असुरक्षित आहेत रुग्णालयाच्या कारभारावर सवाल उपस्थित होत आहे 

जम्बो म्हणले की सगळ्या सोईसुविधा आल्या का मॅनेजमेंट?

किती छान आहे कोण कधी आले कधी गेले पत्ता नाही याला आळा घालण्यासाठी कोणती यंत्रणा आहे की नाही आरोग्यमंत्री टोपे यांनी लक्ष देण्याची गरज आहे जर पुण्यासारख्या मेट्रो शहरात ही परिस्तिथी तर बाकी ठिकाणी काय होणार आरोग्य व्यवस्थेचा हा कारभार नीट करणे गरचेचे आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies