Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पत्रकारिता समाजसेवा की माध्यम


पत्रकारिता समाजसेवा की माध्यम?

सारंग जोशी
उस्मानाबाद

एखादी बातमी किंवा तिचा शोध घेण ही एक पत्रकारीता नसुन ती एक प्रकारची "समाजसेवाच" आहे अस्स मी मानतो. आता बातम्यांच कसय दोन प्रकार आहेत एक म्हणजे सकारात्मक बातमी तर दुसरी नकारात्मक बातमी आणि या दोन्हींचा दुवा म्हणजे " "पत्रकार" आपल्या बोलीभाषेत याला "खबऱ्या"  पण म्हट्ल जातं आता हा "खबऱ्या" किंवा "पत्रकार" कधी गावपातळीवर आढळतो किंवा शहरी भागात ही दिसुन येतो यासाठी एक उदाहरण म्हणजे आपला एखादा असा मित्र असतो ज्याच्याकडे गावातली, शहरातली , गल्लीबोळातली सगळी बातमी उपलब्ध असते किंवा गावातले पारावर बसलेले , तात्या , मामा अण्णा , नाना लोकही वडाखाली बसुन आपलं एक चॅनल चालवतात . आणि गावातले खरे सीसीटीव्ही कॅमेरेही ते शोभुन दिसतात असो!

  आपण एखाद्या गोष्टीची शहानीशा करण्याआधी त्या गोष्टीचा कसून तपास करतो.त्यासाठी एखादा मध्यस्थी घेतो तो पण बातमी पुरवण्यात पटाईत समजला जातो. आता कधी कधी कळत - नकळत काही चुकीच्या बातम्या कानी येऊ लागल्या तर ती एक बातमी नसुन निव्वळ "अफवा" ठरली जाते त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो .


     सध्या सोशल मिडिया एक प्रसारमाध्यम बनल आहे ते देखील कधी कधी चुकीच्या " अफवा पसरवत जातं जणु अफवा पसरविण्यात त्यांचा पायंडा ठरलेला असतो.


    मात्र साधारणपणे जी इलेक्ट्रॉनीक मिडिया आहे ती अशा पद्धतीच्या शक्यतो काही गोष्टी होऊ देत नाही . असं काही होणार नाही याची पुर्णपणे ही "टेलीव्हीजन" मिडीया काळजी घेते किंवा तसा प्रसंग जरी ओढावला तरी त्या प्रकरणात ती मिडिया , संबंधीत पत्रकार बंधु या गोष्टीची जाहीरपणे माफी मागते , दिलगीरी व्यक्त करते हे वर्तमानपत्रातील पत्रकार बंधुनाही लागु पडते . हे पत्रकारीत असणारे खरे "संस्कार" मी मानतो! 


    वर्तमान पत्रात छापली जाणारी बातमी सर्वात मेहनती , कष्टदायी मला वाटते कारण एक दिवसात असंख्य घटना घड़त असतात संबंधीत बातमी गोळा करण त्याचं शिर्षक तयार करण , शक्यतो ती बातमी "शिळी" लागणार नाही याची काळजी घेण आणि महत्वाचं म्हणजे छायाचित्रकार बंधुंची तर वर्तमान पत्रात एक मुख्य भुमीका मला वाटते 

कारण त्याशीवाय ती बातमी "फुगलेल्या पोळीप्रमाणे " आकर्षीत स्वरुपात जाणवते ! 


   माझ्या म्हनण्यानुसार एखादी बातमी , एखादी घटना, एखादी जाहीरात , एखादी माहीती ही लोकांपर्यंत चुकीच्या पध्दतीने नं जाण्याकरीता किंवा बातमी पुरवण्यात बातमीदारात कुठलाही संभ्रम होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी आज मला सांगावीशी वाटते 


   ती खालीलप्रमाणे;


१. पत्रकारितेत तुम्हाला आवड असणं महत्वाचं आहे हा मुद्दा नं एक.


२. तुम्हाचा त्यात झालेला कोर्स हा केवळ ज्ञान घेण्यासाठी ठरू शकेलही परंतु "अनुभव" घेत जाण आणि अनुभवाला आपला गुरू माननं हे सर्वात महत्वाचं मी समजतो.


३. त्यासंबंधी असणाऱ्या तज्ञ लोकांचा आदर करण, त्यांचा वेळोवेळी सल्ला घेणं त्यांना त्यांचा अनुभव विचारण हे तुम्हाला एका उंचीवर घेऊन जाण्यात यशस्वी ठरेल.


४. संवादकौशल्य : तुम्हाला उद्या अशी जरी वेळ आली की संवादात्मक बातमी तुम्हाला द्यायची आहे. किंवा ग्राउंड रिपोर्ट तुम्हाला हातात माईक घेऊन द्यायचा आहे ; तर त्यासाठी तुम्हाला संवाद येनं हे गरजेच आहे त्यासाठी कायम बोलके रहा.


५. भाषा : तुम्हाला ज्या भाषेतुन पत्रकारीता करायची आहे ती भाषा , त्या भाषेवर असणारं प्रभुत्व , आणि महत्वाचं म्हणजे भाषेचा "लहेजा" यावरही तुमची प्रत्रकारीता अधिक प्रभावीत ठरू शकते. उदा. तुम्ही शहरी भागात एखादी बातमी किंवा रिपोर्टिंग घ्यायला जाता तेव्हा तिथे शक्यतो शुध्द प्रमाण भाषा तुम्ही बोला. किंवा ग्रामीण भागात याविरुध्द साधी बोली , त्यांना समजेल अशी  "गावकी" स्वरुपातली भाषा बोलण्याचा प्रयत्न करा ( मात्र यात अतियशोक्तीपणा दिसता कामा नये)


६ . वाचन : वाचाल तरच "वाचाल" ही म्हन तुम्ही अनेकवेळा ऐकली असेल . आणि हे खरे आहे . कारण अधिक वाचन केल्याने तुम्हाला जास्त शब्दभंडार  प्राप्त होते त्यामुळे वाचन हे फायद्याचे आणि सक्तीचे ठरवा.


७. मुलाखत: पत्रकारीतेत असणारा प्रमुख घटक म्हणजे "मुलाखत" होय. त्यासाठी तुम्ही प्रश्न निर्माण करायला शिका , प्रश्न शोधायला शिका हे देखिल सखोल माहिती मिळवण्यासाठी अधिक फायद्याच आणि उत्तरे मिळवण्यासाठी गरजेचे आहे . मात्र प्रश्न आणि प्रश्नांच्या पद्धती या प्रगल्भ स्वरुपाच्या असाव्या.


८. क्षेत्र :  प्रत्येक क्षेत्रांशी तुम्ही तुमची नाळ  घट्ट करा. उदा : क्रिडा, साहीत्य , नाटक सिनेमा , शेती , आर्थिक गोष्टींची जान या क्षेत्रांविषयी जवळीक साधायला बघा , हेही बंधनकारक आहे.


९.शैली: हा सर्वात प्रमुख घटक आहे , यावर तुमचा प्रभाव अवलंबुन आहे उदा. एखाद्या वर्तमानपत्रातली बातमी कोणी दिली आहे हे वाचतानाच एखाद्याच्या लक्षात यायला हवे किंवा रेडीओ वर बातम्या कोण देत आहे हे त्यांच्या शैलीवरून काही लोक ओळखतात त्यासाठी स्वतःची शैली निर्माण करा.


१०. शोध: सर्वांत महत्वाचा आणि प्रमुख घटक म्हणजे एखाद्या बातमीचा शोध घेण , त्याचा तपास करण  ; एखादी घटना घडली असेल तर त्याचे वेळ , ठीकाण , त्या घटनेचे साक्षीदार या गोष्टीची शहानीशा करा , ऐकीव बातम्यांचा तुम्हाला  बळी पडु देवु नका.


११. शिर्षक : एखादी बातमी समोर आनण्यापुर्वी त्या बातमीला चांगले वेगळेपणा असलेले शिर्षक बनवायला शिका . तरच ती बातमी उठावदार व आकर्षात ठरू शकते.


 यामध्ये मला अजुन बऱ्याच गोष्टी ठाऊक आहेत . त्या वेळो वेळी मी मांडणार आहे .पत्रकार होणं खरचं सोप्प नसतं पण याला आवड , जिद्द ,चिकाटी परिश्रम या गोष्टी खुप गरजेच्या आहेत . मला आवडणाऱ्या क्षेत्रांपैकी पत्रकारीता हे क्षेत्र आहे म्हणुन हा माझा लेख आणि काही उपयोगी माहीती मी तुम्हाला शेअर करतोय. जेने करून भाविष्यात याचा कोणाला तरी लाभ व्हावा हा माझा प्रांजळ उद्देश आहे . 


(टीप : मी यामध्ये कोणी तज्ञ नाही परंतु मी जे परीक्षण केलं त्यामधुन मला जे वाटलं ते मी लिहीत गेलो काही  चुकीचे वाटल्यास - क्षमस्व)

               

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies