पीएमपीएमएल बसची हालत रामभरोशे ,कधी कोठे बंद पडेल सांगता येत नाही - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 30, 2020

पीएमपीएमएल बसची हालत रामभरोशे ,कधी कोठे बंद पडेल सांगता येत नाही

  पीएमपीएमएल बसची हालत रामभरोशे ,कधी कोठे बंद पडेल सांगता येत नाही

नागरिकांना सकाळी जॉब ला जाताना होतो नाहक त्रास

मिलिंद लोहार-
महाराष्ट्र मिरर टीम पुणेगेल्या सहा दिवसापासून शेवाळवाडी /हडपसर वरून येणाऱ्या बस मधेच बंद पडत आहेत सकाळी नोकरीसाठी जात असताना कामगार आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे

गेल्या सहा दिवसंपासून एक बस फातिमा नगर च्या स्टॉप वर उभी आहे तिला कोण वाली आहे का नाही असा सवाल उपस्थित होत आहे ज्यावेळेस बंद पडली त्यावेळेस नागरिक उभे राहून दुसऱ्या बसची वाट बघत होते व असे वाटले होते की बस घेऊन जायला कोणीतरी येईल परंतु आज सहा दिवस झाले तरी ती बस फातिमा नगर मेन रोड वर अजूनही उभी आहे मात्र रोजच असल्या बंद पडणाऱ्या बसची दुरुस्ती का होत नाही बेवारस सारखी बस नीट करायला कोण का येत नाही कोरोना काळात लोक कसेबसे नोकरीसाठी जात आहेत एवढ्या दिवस बसेस बंद होत्या मात्र आता सर्व चालू झाले आहे तरी बसेस चांगल्या स्थितीत का नाहीत असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.


No comments:

Post a Comment