Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने मुलीने केली गळफास लावून आत्महत्या

 ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने मुलीने केली गळफास लावून आत्महत्या

 

 कुलदीप मोहिते-कराड



कराड तालुक्यातील औड  या ठिकाणी प्रतिक्षा(नाव बदललं आहे) या विद्यार्थिनीने इयत्ता आठवी ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल मिळाला नसल्यामुळे अवघ्या पंधराव्या वर्षी गळफास लावून राहत्या घरी नैराश्यातून आत्महत्या  केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे

प्रतिक्षाच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. तिच्या वडिलांचे निधन झाले असून आई मोलमजुरी करून घर चालवते. घरी आई, प्रतिक्षा व तिचा भाऊ अक्षय अशा तिघांचे हे कुटुंब चालवताना त्यांची दमछाक होत आहे. त्यात ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने त्यांच्यासमोर मोठाच प्रश्न निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा आईकडे मोबाईलची मागणी करत होती. मात्र पैसे नसल्यामुळे आपण दिवाळीपर्यंत मोबाईल घेऊ असे सांगून आईने तिची समजुत घातली होती.


तथापि, ऑनलाईन शिक्षण सुरूच असल्याने प्रतिक्षाच्या जिवाची उलघाल सुरू होती. चार महिन्यांपासून ती शेजारी पाजारी तसेच मैत्रिणींकडे जावून ती अभ्यास करत होती. दररोज मोबाईलसाठी इतरांच्या घरी जायला लागत असल्याने ही बाब तिने मनाला लावून घेतली होती. शनिवारी सकाळी आई रेशनिंगचे धान्य आणण्यासाठी गेली होती. काही वेळाने धान्य घेऊन ती घरी आली. धान्य घरात ठेवून ती मोलमजुरीसाठी शेतात गेली. तेथून  तिने शेजारच्या एका मुलीला फोन करून प्रतिक्षाला शेतात पाठवून दे असे सांगितले. त्यामुळे संबंधित मुलगी प्रतिक्षाला आईचा निरोप देण्यासाठी तिच्या घरी गेली असता प्रतिक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्या मुलीला पहायला मिळाले. ते पाहून तिला धक्का बसला. 


तिने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही त्या ठिकाणी धावले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने ओंड परिसरासह तालुक्यातील लोकांची मने हेलावली आहेत. घटनेची नोंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies