धीरुभाई अंबानी हॉस्पिटल सुरू करण्याच्या भाजयुमोच्या मागणीला यश - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 28, 2020

धीरुभाई अंबानी हॉस्पिटल सुरू करण्याच्या भाजयुमोच्या मागणीला यश

 धीरुभाई अंबानी हॉस्पिटल सुरू करण्याच्या भाजयुमोच्या मागणीला यश

महाराष्ट्र मिरर टीम-कर्जतकर्जत येथील पत्रकार संतोष पवार यांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्यावर याबाबत नागरिकामध्ये असंतोष उफाळून आला होता. त्यानंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने 4 व्हेंटिलेटर कर्जत मध्ये पाठवून दिले होते. पत्रकारांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्यावर भाजयुमोचे प्रदेश सचिव हृषीकेश जोशी यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माने यांची भेट घेऊन अंबानी येथील रुग्णालयाची क्षमता का वापरली नाही? याबाबत जनजागृती का नाही केली? असा सवाल करून तिकडच्या सेंट्रल ऑक्सिजन युनिटचा वापर व्हावा अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी शल्य चिकित्सक यांना सूचना दिल्या व पाहणी केली. भाजपच्या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री यांनी देखील अंबानी रुग्णालयाच्या विषयात लक्ष घातले व आता अंबानी रुग्णालय नागरिकांसाठी सुरू करण्याचे आदेश भाजयुमोला देण्यात आलेले आहेत. जोशी यांच्या पत्राची वेळेत दखल न घेतल्याने भाजयुमोच्या आढावा बैठकीत जोशी यांनी जिल्हाधिकारी या पालकमंत्र्यांच्या सचिव असल्यासारख्या वागत आहेत अशी जाहीर टीका केली होती. तसेच आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. गेले सहा महिने सरकार ने हे हॉस्पिटल सुविधा असताना ताब्यात का नाही घेतलं? त्यावर खर्च का नाही केला? असा सवाल जोशी यांनी केला असून जिल्हाधिकारी यांना स्वायत्त अधिकार असताना त्या रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीशी संबधित लोकप्रतिनिधीच्या राजकीय दबावात काम करत आहेत अशी टीका जोशी यांनी केली आहे. अंबानी रुग्णालय लोधीवली येथे असताना जिल्हाधिकारी यांनी कशेळे येथे असणाऱ्या अदृश्य अंबानी रुग्णालयाबाबत आदेश काढले असल्याचे निदर्शनास आल्याने नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या सूचना अंबानी रुग्णालयाला मिळाल्या होत्या की नाही? याबाबत साशंकता असून जिल्हाधिकारी प्रशासनाचा भोंगळ कारभार यामुळे उघड झाला आहे.
No comments:

Post a Comment