विना अनुदानित शाळेचे शिक्षक वाऱ्यावर-शिक्षकांना भरपाई द्यावी अशी मागणी - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Thursday, September 3, 2020

विना अनुदानित शाळेचे शिक्षक वाऱ्यावर-शिक्षकांना भरपाई द्यावी अशी मागणी

 विना अनुदानित शाळेचे शिक्षक वाऱ्यावर-शिक्षकांना भरपाई द्यावी अशी मागणी

(शिक्षक दिनेश भुसारी यांचे महाराष्ट्र मिररला पत्र)


जगभरामध्ये  कोरोना रोगाने  हाहाकार माजला आहे.सर्वच देशांचे आर्थिक नुकसान जास्त झाले आहेत.सर्व  देशातील जनता  ह्या रोगामुळे त्रस्त झाली आहेत.यामध्ये सर्वाधिक फटका बसला तो  गरीब जनतेला.श्रीमंत माणूस कमवलेल खात आहे.पण गरीब माणूस खूप गोष्टींना सामोरे जात आहे. सर्व जनता  आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्यामुळे सरकारने  हळूहळु  सर्व गोष्टी चालू करत गेले.आता सर्व चालू आहे परंतु शाळा बंद आहेत.जे बाहेर कामाला होते ते कामाला गेले.पण जे शाळेवरती शिक्षक आहेत त्यांनी काय करावं ? ज्यांचे शिक्षण क्षेत्रामध्ये समाजसेवा मधून मुलांसाठी आयुष्य घालवले.अर्ध्याने तर स्वतःचे शिक्षणाचे क्लासेस चालु केले काहीनी तर मुलांसाठी फिजिकल फिटनेस म्हणून कराटे,स्पोर्ट्स असे वेगवेगळे उपक्रम केले व  बाहेर क्लासेस चालू केले. मुलांसाठी  अहोरात्र झटणाऱ्या  या शिक्षकांकडे  कोणाचे लक्ष नाही ह्या शिक्षकांकडे एवढी पॉवर आहे की  उद्याची पिढी  कशी घडवली पाहिजे  हे सर्व शिक्षकांच्या हातात असते.आज जे काही  डॉक्टर,पोलीस, इंजिनीयर तसेच इतर क्षेत्रात काम करणारे मंडळी हे शिक्षण घेऊनच पुढे जात आसतात त्यामुळेच विशेषत  समाजात  शिक्षकाला  मान सन्मान असतो. परंतु  या कोरोना कालात शिक्षकांकडे लक्ष नाही अनेक शिक्षक हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे शेती करत आहेत कोण कंपनीमध्ये जात आहेत.तसेच खूप आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरी मला असं वाटतं  की  सरकारने विशेषत खाजगी शिक्षकांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे.


आपल्या समाजामधील एक व्यक्ती व शिक्षक दिनेश भुसारी कर्जत

No comments:

Post a Comment