बँकेतील गैरव्यवहार व विनयभंग प्रकरणी पीडितेचा आंदोलनाचा इशारा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, September 3, 2020

बँकेतील गैरव्यवहार व विनयभंग प्रकरणी पीडितेचा आंदोलनाचा इशारासांगली येथील बँकेतील गैरव्यवहार व विनयभंग प्रकरणी  पीडितेचा आंदोलनाचा इशारा


कुलदीप मोहिते-

महाराष्ट्र मिरर टीमसहकार क्षेत्रातील एका बँकेतील गैरव्यवहार व विनयभंग प्रकरणी पीडित   महिलेने बँकेसमोर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे दरम्यान पीडित महिला एका सहकारी बँकेत हंगामी तत्त्वावर कामाला आहे बँकेत कायमस्वरूपी होण्यासाठी व पगार वाढवण्यासाठी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल व मिळणाऱ्या पगारातून काही रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी लागेल यासाठी त्याच बँकेतील वरिष्ठ अधिकार्‍याकडून पीडित महिलेवर सतत तगादा व दबाव आणून तिचा मानसिक छळ करत होते या संबंधित पीडित महिलेने महीला आयोग व जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार देखील दाखल केली आहे तसेच या सहकार बँकेत अनेक दिवसापासून गैरव्यवहार सुरू आहेत शेतकऱ्यांची बँक असताना व्याजात सूट दिली जात नाही सवलत दिल्याचे कागदोपत्री दर्शविले जाते तो पैसा कोणाच्यातरी घशात तर घातला जात नाही ना यासंबंधी तक्रार ही साखर आयुक्तांकडे दाखल आहे दरम्यान शिव सहकार संघटने पीडितेला न्याय मिळावा व सर्व गैरप्रकार थांबवावेत अन्यथा पीडित महिलेचे सर्व कुटुंबासमवेत 7 सप्टेंबर रोजी बँकेसमोर बेमुदत उपोषण  करण्यात येईल असा इशारा दिला आहे

No comments:

Post a Comment