ग्रामीण भागातील रुग्णांसाठी डॉ. तेजस घुडे यांचा मदतीचा हात... - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Friday, September 25, 2020

ग्रामीण भागातील रुग्णांसाठी डॉ. तेजस घुडे यांचा मदतीचा हात...

 ग्रामीण भागातील रुग्णांसाठी डॉ. तेजस घुडे यांचा मदतीचा हात...


           सुधाकर वाघ-मुरबाड


मुरबाड तालुक्यात कोरोना साथीचा फैलावं वाढत चालल्याने ग्रामीण भागातील लोक हवालदिल झाले आहेत त्यांना मदत करण्यासाठी तालुक्यातील उंबरपाडा -- सरळगावचे​ भूमिपुत्र​ डॉ तेजस दिगंबर घुडे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

​ ​ ​

डॉ तेजस घुडे ठाणे महानगर पालिकेच्या कोविड रुग्णालयात अतिदक्षता विभागात सल्लागार म्हणून कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत व​ आरोग्यम या खाजगी कोविड रुग्णालयात रुग्णांवर उपचार करत आहेत तसेच ते रोहिणी रूग्णालय ठाणे येथे छातीचे रोगावर तज्ञ चेस्ट फिजीशियन (Chest Physician) म्हणून काम करत आहेत ग्रामीण भागातील कोविड संसर्ग झालेल्या अनेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांनी मदत केली आहे ग्रामीण भागातील लोकांना खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत व सल्ला पाहिजे असल्यास त्यांचा मोबाईल फोन नंबर​ 9372304908​ वर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment