भातशेती कापणीस तयार ,पाऊस थांबण्याची प्रतीक्षा ! - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Wednesday, September 23, 2020

भातशेती कापणीस तयार ,पाऊस थांबण्याची प्रतीक्षा !

 भातशेती कापणीस तयार ,पाऊस थांबण्याची प्रतीक्षा !

संतोष सुतार-माणगांवखरीप हंगामातील भातशेती कापणीस तयार झाली असून लांबलेला पाऊस थांबण्याची शेतकरी वाट पाहत आहेत.

  तालुक्यातील खरीप हंगामातील भातशेती कापणीस तयार झाली आहे.जूनमध्ये सुरू झालेल्या पावसाने यावर्षी लावणीची कामे लवकर आटोपली होती.त्यामुळे 90 ते 100 दिवसांची भातशेती कापणीस तयार झाली आहे.तालुक्यात साधारणपणे 200 एकर शेतीवर भात लागवड झाली आहे.

  पाऊस थांबण्याची शेतकरी वाट पाहत असून येत्या काही दिवसांत पावसाने उघडीप दिल्यास शेतकरी कापणीच्या कामास सुरुवात करतील .चांगल्या पावसाने तालुक्यातील भातशेती चांगली झाली असून शेतकरी कापणीच्या कामासाठी तयार झाले आहेत.यावर्षी कोरोना महामारी व निसर्ग चक्रीवादळ यामुळे तोट्यात असलेल्या शेतीकडून शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा आहे.

तालुक्यातील भातशेती उत्तम प्रकारे आहे. दरवर्षी प्रमाणे भातशेतीची लागवड झाली आहे.पाऊस थांबल्यास शेतकरी कापणीच्या कामास सुरुवात करतील.

बाळकृष्ण काप

कृषि अधिकारी -माणगांव.

 


90 दिवसांची भातशेती कापणीस तयार आहे.पाऊस थांबल्यास कापणीची कामे सुरू होतील.परतीच्याया पावसाने उघडीप दिल्यास भातशेती उत्तम होईल.

सीताराम पोटले.शेतकरी.

No comments:

Post a Comment