कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी आझाद हिंद संघटनेकडुन माणगांव तालुक्यात महामार्गावर कांद्याची हाेळी व माळा अर्पण करुन आंदाेलन... - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Wednesday, September 23, 2020

कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी आझाद हिंद संघटनेकडुन माणगांव तालुक्यात महामार्गावर कांद्याची हाेळी व माळा अर्पण करुन आंदाेलन...

 कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी  आझाद हिंद संघटनेकडुन माणगांव तालुक्यात महामार्गावर कांद्याची हाेळी व माळा अर्पण करुन आंदाेलन...


 संतोष सुतार-माणगांव

केंद्र सरकारने कांद्यावर घातलेली निर्यातबंदी उठवावी व निर्णयाचा पुन्हा विचार व्हावा याकारिता आझाद हिंद संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या कडुन 15 सप्टेंबरपासुन राज्यव्यापी आंदाेलनाला सुरुवात झाली आहे. यामध्ये माणगांव तालुका पदाधिकाऱ्यांकडुन तहसिलदारांना निवेदन देखील देण्यात आले हाेते.  कांद्याच्या किंमतीत दामदुप्पटीने हाेणारी वाढ, यामुळे शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनता देखील हाेरपळुन निघत असताना केंद्रसरकार या कडे दुर्लक्ष करत असल्याने 22 सप्टें. राेजी माणगांव तालुक्यातील लाेणेरे हद्दीत पन्हळघर फाट्यावर मुंबई-गाेवा महामार्गावर आझाद हिंद संघटनेकडुन कांद्याच्या माळा गळ्यात घालुन व कांद्याची हाेळी करुन व सरकार विराेधी घाेषणा व इन्कलाब जिंदाबाद घाेषणा देत आझाद हिंद संघटनेकडुन सरकारचा निषेध नाेंदविला गेला.   यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र झाेरे,माणगांव तालुकाध्यक्ष संदेश पवार,संदीप कदम ,काेंडीराम काेकरे ,विजय शिंदे व बहुसंख्य आंदाेलनकर्ते उपस्थित हाेते. कांदा निर्यातबंदीविराेधात काेकणात हाेणारे हे पहीलेच आंदाेलन असल्याचे बाेलले जात  आहे. कांद्या विषयीची यापुर्वीची आंदाेलने पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र म्हणजेच घाटमाथ्यावरील शेतकरी नेहमी करत असताे. मात्र काेकणातील शेतकरी कांदा पिकवत नसला तरी आहारात कांदा मात्र नेहमीच वापरत असल्यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्य जनतेची पिळवणुक थांबवावी ,अन्यथा संघटनेचे राज्य अध्यक्ष अँड सतिश राेठे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदाेलन सुरु राहणार असल्याचे उपस्थित आंदाेलनकर्त्यांनी  बाेलताना सांगितले.


No comments:

Post a Comment