नशिब महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर बोराडे यांची निवड - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 14, 2020

नशिब महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर बोराडे यांची निवड

 नशिब महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर बोराडे यांची निवड


गणेश मते-भिवपुरी  'नशीब' महासंघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी आणि कर्जत तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शेखर बोराडे यांची निवड करण्यात आहे. तसेच, जेनेरिक मेडिकल आणि फार्मसी सेलच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. 


नशीब महासंघ ही संस्था देशात विविध क्षेत्रात कार्यरत आहे. रायगड जिल्ह्यातही या संस्थेने कार्य सुरू केले असून संघटनेने भारत सरकार स्कील ट्रेनिंग आणि फिक्कीशी संलग्न संघटना आहे. या संघटनेच्यावतीने नुकतेच कर्जत केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शेखर बोराडे यांची या संस्थेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आली आहे. बोराडे यांनी तालुक्यात विविध क्षेत्रात काम करीत अनेक गरजूंना मदत मिळवून दिली आहे. तसेच, कोरोना महामारीच्या काळात आदिवासींना मदत, वाहतूक बंद असल्याने वाटसरूंना त्यांनी मदत दिली आहे. या कामाची दखल घेत शेखर बोराडे यांच्याकडे रायगड जिल्हा अध्यक्ष पदासह राज्याच्या जेनेरिक मेडिकल आणि फार्मसी सेलच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी, नशीब महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास बोराडे, राष्ट्रीय सचिव ओंकार बोराडे यांच्यासह महाराष्ट्र अध्यक्ष शैलेश कौडगावकर, राज्य उपाध्यक्ष तथा कानसा-वारणा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील, कानसा-वारणा फाउंडेशनचे उपाध्यक्ष अभिजीत माणकर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, शेखर बोराडे यांची कानसा-वारणा फाउंडेशनच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदीही निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment