पराग बोरसे यांच्या चित्राची सलग तिसऱ्या वर्षी निवड - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 13, 2020

पराग बोरसे यांच्या चित्राची सलग तिसऱ्या वर्षी निवड

 पराग बोरसे यांच्या चित्राची सलग तिसऱ्या वर्षी निवड

पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेचे चित्रप्रदर्शन

आदित्य दळवी-

महाराष्ट्र मिरर टीमकर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राची सलग तिसऱ्या वर्षी पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेच्या प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेचे हे ४८ वे  आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शन आहे. गेली सलग तीन वर्षे या संस्थेतर्फे निवड होणारे पराग बोरसे हे एकमेव भारतीय ठरले आहेत. 2018,2019 आणि 2020 या सलग तीन वर्षातल्या प्रदर्शनांसाठी पराग बोरसे यांच्या चित्राची निवड करण्यात आली आहे. या प्रदर्शनामध्ये अमेरिका, इंग्लंड ,फ्रान्स ,इटली ,कोरिया,जर्मनी, चीन अशा अनेक देशातील चित्रांची निवड करण्यात आली आहे.
No comments:

Post a Comment