चिपळूण वनविभागात विभागीय वनाधिकारीपदी दीपक खाडे यांची नियुक्ती - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 2, 2020

चिपळूण वनविभागात विभागीय वनाधिकारीपदी दीपक खाडे यांची नियुक्ती

चिपळूण वनविभागात विभागीय वनाधिकारीपदी दीपक खाडे यांची नियुक्ती

 कोल्हापूर सामाजिक वनीकरण विभागात खाडे यांची उत्कृष्ठ कामगिरी


ओंकार रेळेकर-चिपळूणचिपळूण वनविभागात विभागीय वनाधिकारी रमाकांत भवर हे नुकतेच सेवा

निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी

कोल्हापूर येथील सामाजिक

वनीकरणचे विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांची नियुक्ती झाली आहे. मंगळवारी त्यांनी आपल्या येथील कार्यालयात पदभार स्वीकारला. वर्षभरापूर्वी जिल्ह्याच्या विभागीय

वनाधिकारीपदाची सूत्रे भंवर यांनी स्वीकारली. नियत

वयोमानानुसार सोमवारी ते निवृत्त झाले. जिल्हा वनविभागाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला,

तर नव्याने नियुक्त झालेल्या खाडे यांचे स्वागत

करण्यात आले. विभागीय वनाधिकारी खाडे हे २०१२

मध्ये वनविभागात रूजू झाले. विविध ठिकाणी सेवा

बजावतानाच ते कोल्हापूर येथील सामाजिक

वनीकरणमध्ये कार्यरत होते. खाडे यांनी मंगळवारी

आपल्या पदाचा पदभार स्वीकारत कामकाजास

सुरुवात केली.

No comments:

Post a Comment