कोविड केअर रुग्णालयाचे खासदारांच्या हस्ते उद्घाटन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 2, 2020

कोविड केअर रुग्णालयाचे खासदारांच्या हस्ते उद्घाटन

कोविड केअर रुग्णालयाचे खासदारांच्या हस्ते उद्घाटन.

उमेश पाटील-सांगलीआज तासगांव येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन येथील वसतीगृहात उभारण्यात आलेल्या सर्व सोयींनी युक्त अद्ययावत कोव्हीड केअर हॉस्पिटलचे उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे  खासदार संजयकाका पाटील यांचे हस्ते करण्यात आले

यावेळी ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल माळी, तासगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, डॉ. विजय जाधव, नगरसेवक जाफर मुजावर, नगरसेवक बाळासाहेब सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

याच वेळी तासगांव शहरातील सर्व डॉक्टर आणि मेडिकल स्टाफसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेत शासकीय वैद्यकीय रुग्णालय सांगली येथील तज्ञ डॉक्टर डॉ. सुबोध उगाणे  यांनी सर्व डॉक्टर आणि मेडिकल स्टाफला मार्गदर्शन केले.

खासदार संजयकाका पाटील यांनी पुढाकार घेवून तासगांव तालुक्यासाठी हे सर्व सोयींनी युक्त अद्ययावत कोव्हीड केअर हॉस्पिटल उभारल्यामुळे तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment