Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

बोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू आ . शिवेंद्रसिंहराजे ,धरणस्थळी जावून ग्रामस्थांसोबत केली जागेची पाहणी

 बोंडारवाडी धरण प्रकल्प लवकरच मार्गी लावू आ . शिवेंद्रसिंहराजे ,धरणस्थळी जावून ग्रामस्थांसोबत केली जागेची पाहणी


               प्रतीक मिसाळ-सातारा

जावली तालुक्यातील केळघर मेढा विभागातील ५४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्पाचे काम मार्गी लागले आवश्यक आहे . बोंडारवाडी ग्रामस्थांनी काही मागण्यांसाठी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता . ग्रामस्थ , बोंडारवाडी धरण कृती समीती आणि पाटबंधारे विभाग यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे . सर्वसमावेशक तोडगा काढून जावली तालुक्यात ५४ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बोंडारवाडी धरणप्रकल्पाचे काम मार्गी लावू असे आश्वासक प्रतिपादन आ श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले . बोंडारवाडी ग्रामस्थांनी पिकाऊ शेतजमीन वाचावी आणि धरणाचे काम व्हावे , अशी मागणी करुन या प्रकल्पाला विरोध केला होता . ग्रामस्थांच्या मागणीनुसार आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रत्यक्ष धरणस्थळ आणि जागेची पाहणी केली यावेळी ते बोलत होते . यावेळी अधिक्षक अभियंता प्रकाश मिसाळ कार्यकारी अभियंता महादेव धुळे , सहायक अभियंता ( श्रेणी १ ) जयंत बर्गे शाखा अभियंता संजय पांडकर , सरपंच बाजीराव ओंबळे , वसंत मानकुमरे , संदीप ओंबळे गणपत ओंबळे , विष्णू ओंबळे महेंद्र ओंबळे यांच्यासह बोंडारवाडी ग्रामस्थ उपस्थित होते . एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून केळघर मेढा विभागातील गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी बोंडारवाडी धरण प्रकल्प मंजूरीसाठी सातत्यपुर्ण पाठपुरावा सुरु ठेवला होता . बोंडारवाडी ग्रामस्थ , कृती समिती आणि पाटबंधारे विभाग यांचा समन्वय साधून या प्रकल्पाचे काम पुर्णत्वास जाण्यासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे यांचा प्रयत्न सुरु आहे . बोंडारवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार आ . शिवेंद्रसिंहराजे  यांनी गुरुवारी सकाळी पाटबंधारे विभागाच्या अधिका ? यांसोबत धरणस्थळाची पाहणी केली ज्या जोगवर धरण होत आहे त्या जागेत ग्रामस्थांची शेतजमीन जात आहे . आमची शेतजमीन वाचवी अशी मागणी ग्रामस्थांनी आ . शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली . ५४ गावांचा पाणीप्रश्न आणि बोंडारवाडी ग्रामस्थांची शेतजमीन या दोन्ही बाबींचा विचार करुन सर्वांच्या सहमतीने , कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेवून धरणाचे काम मार्गी लागेल असे आ . शिवेंद्रसिंहराजे यांनी ग्रामस्थांना सांगितले . काहीही झाले तरी बोंडारवाडी प्रकल्पाचे काम मार्गी लावू आणि ५४ गावांचा पाणीप्रश्न सोडवू , असेही ते म्हणाले . कशाचीही तमा न बाळगणारा लोकप्रतिनिधी आ . शिवेंद्रसिंहराजे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीही करतात , हे बोंडारवाडीच्या प्रश्नावरुन पुन्हा एकदा सिध्द झाले . बोंडारवाडी धरणस्थळाची पाहणी करण्यासाठी आ . शिवेंद्रसिंहराजे यांना ६ किलोमीटर चालत जावे लागले आणि पुन्हा ६ किलोमीटर चालत माघारी यावे लागले . ग्रामस्थांचा प्रश्न समजून घेण्यासाठी चिखल , पावसाची तमा न बाळगता ते स्वत : धरणस्थळी गेले प्रश्न नीट समजावून घेतला उपस्थित अधिका ? यांना ग्रामस्थांचा प्रश्न सोडवण्याच्या सुचना केल्या आणि पुन्हा माघारी आले . विष कालवणा ? यांपासून सावध रहावे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बोंडारवाडी प्रकल्पाला मंजूरी मिळवली होती . दुर्दैवाने भाजपाचे सरकार आले नाही . सरकार कोणाचेही असले तरी मी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला आहे आणि करणार आहे . महाआघाडी सरकारकडेही पाठपुरावा करुन हा प्रकल्प मार्गी लावणार आहे . सोशल मिडीयावर विनाकारण वावड्या उठवायच्या , लोकांच्या मनात विष कालवायचं अशा काही विकृती सध्या फोफावल्या आहेत . त्यांना फोटो शूट करुन गाजावाजा करायची फार हौस असते . मला श्रेयवादात पडायचे नाही आणि मला श्रेयही घ्यायचे नाही . मला फक्त जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात आणि ते मी सोडवतोच स्वत : काहीही करायचं नाही काम झालं तर मी केलं म्हणायचं आणि झालं नाही तर आमदारावर ढकलायचं अशा प्रवृत्तींपासून जावलीकरांनी सावध रहावं सातारा- जावली या मोठ्या मतदारसंघात आमदार म्हणून पहिल्या दिवसांपासून मी काम करत आहे . काम करताना कधीही दुजाभाव केला नाही . कास धरणाचे काम पुर्वीच सुरु होते . निधी अभावी रखडल्याने ना . अजित पवार यांच्या सहकार्याने वाढीव निधी मंजूर करुन घेतला मेडीकल कॉलेजही पुर्वीच मंजूर होते आणि ते संपुर्ण जिल्ह्याचे आहे . तसेच हद्दवाढीचा प्रस्तावही बरेच वर्ष प्रलंबीत होता , तो मंजूर करुन घेतला . मात्र यावरुन जावलीकडे दुर्लक्ष केलं असा अर्थ विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी काढला . बोंडारवाडीसाठी माझा पाठपुरावा कसा आहे हे ग्रामस्थ , कृती समिती आणि सर्वांनाच ज्ञात आहे . त्यामुळे गैरसमज पसरवणा ? या विकृतीपासून जनतेने सावध रहावे , असे आवाहन आ शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारांशी बोलताना केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies