ऑक्सीजन ग्रुपचे काम कौतुकास्पद पालकमंत्री बाळासाहेब पाटील - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, September 5, 2020

ऑक्सीजन ग्रुपचे काम कौतुकास्पद पालकमंत्री बाळासाहेब पाटील

 ऑक्सीजन ग्रुपचे काम कौतुकास्पद पालकमंत्री बाळासाहेब पाटील


कुलदीप मोहिते कराड


कराडमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे ऑक्सिजनच्या अभावी  पेशंट दगावत आहेत अशा परिस्थितीमध्ये कराड मधील ऑक्सिजन ग्रुप हा अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आहे गरजू कोरोना  पेशंटला ऑक्सिजन ग्रुप द्वारा ऑक्सीजन सिलेंडरची मदत होत आहे  दरम्यान आज

ऑक्सिजन ग्रुप कराड यांचे वतीने कोरोना संकट काळात बांधिलकी जपत भूषण शहा, संदीप कोटणीस, राकेश छाजेड, ईश्वर जैन, सलीम मुजावर, अनुप शहा  यांनी ॲाक्सीजन काॅंन्संट्रेटर मशीन्स ग्राऊंड लेवलला काम करणाऱ्या  कराड  शहरातील सर्व शासकीय व प्रशासकीय कर्मचारी व गरजू रुग्णांसाठी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्यचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे सूपूर्त केल्या. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ऑक्सीजन ग्रुपचे कौतुक  केले.


याप्रसंगी डी.वाय.एस.पी.सुरज गुरव, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, बी.डी.ओ.आबासाहेब पावर, पी.आय.कराड शहर बी.आर.पाटील, पी.आय.ग्रामीण किशोर धुमाळ व इतर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment