कोरोनामुळे मृत्युचे डेथ ॲाडीट करा: ॲड. अमित शिंदे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, September 5, 2020

कोरोनामुळे मृत्युचे डेथ ॲाडीट करा: ॲड. अमित शिंदे

 कोरोनामुळे मृत्युचे डेथ ॲाडीट करा: ॲड. अमित शिंदे

वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापन जाहीर करून भरारी पथके करा

उमेश पाटील-सांगली

कोरोना मृत्युच्या कारणांचा शोध घेवून मृत्युदर कमी करण्यासाठी तात्काळ डेथ ॲाडीट सुरू करावे. योग्य व वेळेवर उपचार मिळण्यासाठी वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापन तसेच व्हेंटिलेटेड बेड ची उपलब्धता जाहीर करून त्यावर तसेच दवाखान्यातील कामकाज तपासणीसाठी भरारी पथके तयार करावीत अशी मागणी ॲड. अमित शिंदे यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे केलेली आहे. 

याबाबत बोलताना ॲड. अमित शिंदे म्हणाले की, सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना ने थैमान घातलेले आहे. रूग्णांची संख्या कमी होती व रूग्णांवर सिव्हील मध्ये उपचार सुरू होते, तोपर्यंत परिस्थती नियंत्रणामध्ये होती. परंतु आता परिस्थिती गंभीर झाली आहे. काॅन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्णपणे बंद झाले असल्याने बाधीतांवर सुरवातीच्या टप्यातच उपचार सुरू होणे थांबले आहे. लवकर उपचार सुरू न झाल्याने रूग्ण अत्यवस्थ होत आहेत. अशा रूग्णांना व्हेंटिलेटर व ॲाक्सीजन बेड मिळत नसल्याने मृत्यु दर वाढत आहे. जे डाॅक्टर चांगले काम करत आहेत त्यांच्यावरच प्रशासन जास्त लोड देत आहे. परंतु वैद्यकीय मनुष्यबळाचे व्यवस्थापण नीट होताना दिसत नाही. केवळ बेड ची संख्या वाढवून उपयोग नाही. त्यामध्ये ॲाक्सीजन बेड किती? व्हेंटिलेटेड बेड किती? बेड पाठीमागे किती फिजीशियन, किती कन्सल्टंट, किती आर एम ओ आहेत? त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे? बेड मिळण्यासाठी जी व्यवस्था केली आहे त्याद्वारे किती रूग्णांना बेड मिळाले आहेत? त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी कोणती व्यवस्था आहे? हे समजून येत आहे. या सर्वांवर लक्ष देवून सक्षम यंत्रणा उभी करणे अत्यावश्यक आहे. प्रशासन वैद्यकीय कर्मचार्यांवर मेस्माची कारवाई करत आहे परंतु सर्व डाॅक्टराना कोरोना नियंत्रणासाठी का पाचारण करत नाही? त्यामुळे वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापण जाहीर करून त्याप्रमाणे काम होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तसेच दवाखान्यामध्ये सुरू असणारे उपचार व व्यवस्थापणावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापण करावीत. 

कोरोना बाधीतांच्या मृत्युचे प्रमाण वाढत असताना पूर्वी करत असलेले डेथ ॲाडीट सध्या का केले जात नाही? मृत्यूची कारणे समजून त्यानुसार कामात सुधारणा करण्यासाठी कोरोना बाधितांचे डेथ ॲाडीट होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोरोना बाधीत मृत्युसंदर्भात तात्काळ डेथ ॲाडीट करावे जेणेकरुन मृत्युदर कमी करता येईल. 


यावेळी जयंत जाधव, महालिंग हेगडे, सुभाष तोडकर, गजानन गायकवाड,नितीन मोरे, प्रविण कोकरे, सचिन चोपडे, दाऊद मुजावर, नितीन शिंदे, सुरेश मुत्तलगिरी, विवेक जाधव, विकास घोरपडे, हेमंत तोडकर, मुराद पटेल, अमित बेडकाळे,बापू कोळेकर,प्रकाश जामदार,रमेश डफळापुरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment