पत्रकार प्रमोद पेडणेकर अल्पशा आजाराने निधन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, September 7, 2020

पत्रकार प्रमोद पेडणेकर अल्पशा आजाराने निधन

 पत्रकार प्रमोद पेडणेकर अल्पशा आजाराने  निधन


ओंकार रेळेकर-चिपळूणचिपळूण येथील पुढारीचे ब्युरोचीफ प्रमोद पेडणेकर यांचे आज सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्यांना अन्ननलिकेचा त्रास होत होता. काल रविवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली होती. आज सोमवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने चिपळूण शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 'सामना'चे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. यानंतर गेली अनेक वर्षे ते दैनिक 'पुढारी'मध्ये सेवेत होते. समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांचा गाढा अभ्यास होता. वर्तमानपत्रात स्पेशल रिपोर्ट लिहिण्याची त्यांची खासियत होती. त्यांची बेधडक पत्रकारिता लोकप्रिय होती,

जीवाला जीव देणारा दिलदार मित्र हरपला-- सचिन खरे

 जीवाला जीव  देणारा दिलदार मित्र हरपला असल्याची खंत शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते सचिन खरे यांनी व्यक्त केली आहे,मी शिवसेना पक्षाचे काम सुरू केल्यापासून प्रमोद पेडणेकर यांचे पत्रकारितेतील सामाजिक कार्य जवळून पाहिले आहे, दिलदार स्वभाव ,सर्वांशी मिळून मिसळून राहणे ही त्यांची खासियत होती. शिवसेनेच्या विचारधारेशी ते एकरूप होते ,ते माझ्या जवळचे सहकारी होते. मी विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख असताना ते  लांजा तालुका संभाळायचे. माझ्यावर मनापासून प्रेम करणारा  माझा सहकारी गेला. हे खूप दुःखद आहे. अशी प्रतिक्रिया खरे यांनी व्यक्त केली आहे,

No comments:

Post a Comment