मायणी येथे चंदना चोरांचा सुळसुळाट - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, October 6, 2020

मायणी येथे चंदना चोरांचा सुळसुळाट

 

मायणी येथे चंदना चोरांचा सुळसुळाट

मिलिंदा पवार-वडूजमायणी व मायणी परिसरातील शेतकऱ्यांनी बांधावर चंदनाची झाडे लावली आहेत तर काही झाडे नैसर्गिक  रित्या उगवत आहेत या झाडांची शेतकरी जीवापाड काळजी घेत आहेत व वाढवत आहेत मात्र काही दिवसांपासून मायणीच्या परिसरात  चंदन चोरांचा सुळसुळाट झाला आहे वर्षानुवर्ष जोपासना केलेली झाडे एका रात्री चोरून नेली जात आहेत.

मायणी येथील शेतकरी रंगराव कचरे यांच्या मळ्यातील घराजवळ पाच चंदनाचे झाडे चोरांनी रात्री बुंध्यापासून कापून नेली यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चंदन चोरांचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी सर्व शेतकरी वर्गाकडून होत आहे.No comments:

Post a Comment