किसान युवा क्रांती संघटनेच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी दिनेश ठाकरे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 6, 2020

किसान युवा क्रांती संघटनेच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी दिनेश ठाकरे

किसान युवा क्रांती संघटनेच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी दिनेश ठाकरे 


गणेश मते-कर्जतशेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी लढणारी म्हणून ओळख असलेल्या किसान युवा क्रांती संघटनेच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी दिनेश ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्रक नुकतेच संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी दिले. 

राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या आहेत. याबाबत सरकारी पातळीवर त्यांच्या मागण्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढत आहेत. कोरोना महामारीमुळे वाहतूक बंद आलेल्या काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे आवश्यक असून युवकांचा सहभाग गरजेचा आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात किसान युवा क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येत आहे. 

कर्जत तालुक्याला एकेकाळी भाताचे कोठार म्हटले जात होते. मात्र  येथील परिस्थिती बदलत आहे. अतिपावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांना त्याची मदत मिळताना वर्ष जाते. उन्हाळी शेतीचा प्रश्नही आहे. शेतकऱ्यांच्या अशा विविध समस्या निवारणासाठी कर्जत तालुका अध्यक्षपदी नुकतेच दिनेश ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली असून आपण संघटनेच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळून देऊ. प्रसंगी आंदोलन करू, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment