भातशेती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार - दिनेश ठाकरे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, October 24, 2020

भातशेती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार - दिनेश ठाकरे

 भातशेती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार - दिनेश ठाकरे 

गणेश मते-कर्जत


परतीच्या पावसाने भातपिके भुईसपाट झाली आहेत. यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यासाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली असली तरी अद्याप पाहणीचे काम सुरू आहे. मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही किसान युवा क्रांती संघटनेचे कर्जत तालुकाध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी दिली. 

किसान युवा क्रांती संघटनेच्यावतीने नुकतेच कर्जत तालुक्यातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे तालुका सचिव राहुल शिंदे, डिकसळ येथील शेतकरी गणपत पाटील, भानसोली येथील शेतकरी अमित कडव यांसह इतर शेतकरी उपस्थित होते. 

परतीच्या पावसाने भातशेतीसह इतर पिकांचे मागील महिन्याभरात मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके मातीमोल झाली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. सदर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी किसान युवा क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. नुकतेच त्यांनी डिकसळ, पाली, भानसोली येथील भातशेतीची पाहणी केली. यावेळी, मोठ्याप्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले असून सदर शेतकऱ्यांना मदत मिळून देऊ. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आपापल्या स्थरावर काम करीत आहे. तसेच, आम्हीही प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे, असे दिनेश ठाकरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment