वर्दीतील स्त्रीशक्ती,महिला पोलीस नाईक आरती राऊत
विजय गिरी-श्रीवर्धन
नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव.कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे.त्या स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न .शक्तीचे, बुद्धीचे, नीतीचे, भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते.महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्त्रीशक्ती अनेक प्रकारे समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहेत.
रायगड पोलीस (Raigad Police) दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस नाईक आरती राऊत यांनी श्रीवर्धन येथे बंदोबस्तावर जात असताना वाशी-तळा गावाजवळ वादळात अडकलेल्या प्रसूती वेदना होत असणाऱ्या गर्भवती महिलेला वाटेतील अडथळे दूर करुन रुग्णालयात पोहोचविले. राऊत यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ मदत केल्याने महिला व बाळाला जीवनदान मिळाले. कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून राऊत यांनी केलेल्या मदतीमुळे वर्दीची शान उंचावली आहे. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून राऊत यांच्या कार्याचा मला अभिमान वाटतो.
नवरात्र उत्सवाचे पवित्र पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील असामान्य कार्य करणार्या स्त्री शक्तीची ओळख करुन देत असताना मला मनस्वी आनंद होत आहे.
अनिल देशमुख- गृहमंत्री
नवरात्र उत्सवाचे पवित्र पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील असामान्य कार्य करणार्या स्त्री शक्तीची ओळख करुन देत असताना मला मनस्वी आनंद होत आहे.
अनिल देशमुख- गृहमंत्री