लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे दिसणार आता" आई कुठं काय करते या मालिकेत वेगळ्या भूमिकेतून.... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 13, 2020

लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे दिसणार आता" आई कुठं काय करते या मालिकेत वेगळ्या भूमिकेतून....

 लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे दिसणार आता" आई कुठं काय करते या मालिकेत  वेगळ्या भूमिकेतून....


छत्रपतींची लेक म्हणून अत्यंत दमदार भूमिका पार पाडली स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत.
राम जळकोटे-उस्मानाबाद“स्वराज्यरक्षक संभाजी” या मालिकेमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडत ‘राणूआक्कासाहेब’ यांची भूमिका जीवंत केलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे ही आता प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवरील “आई कुठे काय करते” या मालिकेतून आता एक नवीन भूमिका घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.तिने केलेली स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेतील रानुआक्का साहेब ही दमदार भूमिका लोकांच्या मनावर ठसा उमटवून गेली. अभिनेत्री अश्विनी महांगडे ही वाई (सातारा) येथील असून  महिलांविषयी असलेल्या अडचणी तिने “महावारी” या वेबसिरीज मध्ये मांडल्या होत्या त्यामुळे ज्या गोष्टी महिलांना बोलताना लाज वाटत असे त्या गोष्टी धाडसाने व्यक्त कशा कराव्या हे स्पष्ट केले होते. त्यामुळे ही वेबसिरीज देखील चांगली गाजली आहे. त्याचबरोबर सध्या त्या महिलांवरील कौटुंबिक हिंसाचारापासून रक्षण करणाऱ्या कायद्याविषयी जनजागृती करत आहे. अशी सामाजिक बांधिलकी जपणारी गुणी अभिनेत्री पुन्हा सद्या स्टार प्रवाह वर गाजत असलेल्या “आई कुठे काय करते” या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.No comments:

Post a Comment