पंढरपूर शहरासह सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी पुढील 48 तास हे मुसळधार पावसाचे असणार आहेत .
उमेश पाटील -सांगली
सर्वात जास्त पाऊस हा चक्रीवादळाच्या केंद्रबिंदू पासून असणाऱ्या गावांमध्येच पडेल . यामध्ये अक्कलकोट , दक्षिण सोलापूर , मंगळवेढा , पंढरपूर, सांगोला या तालुक्यांमध्ये अधिक प्रभाव दिसेल .
पश्चिम महाराष्ट्रातील मध्य पट्ट्यामध्ये आलेले चक्रीवादळ तसेच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही पर्जन्यस्थिती निर्माण झाली आहे.
14 ऑक्टोबर रोजी दुपारी चार च्या दरम्यान कलबुर्गी - उस्मानाबाद या पट्ट्यातून हे चक्रीवादळ प्रत्यक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. त्याचा मार्ग
अक्कलकोट - मंद्रूप - वरवडे - घेरडी - जवळा - चिनके - खानापूर असा असणार आहे .
याचा परिणाम संपूर्ण जिल्हाभर दिसेल .
महत्त्वाचे म्हणजे चक्रीवादळाच्या केंद्रबिंदू पासून शंभर किलोमीटर अंतरावर पाऊस ताशी 70 ते 100 मिलिमीटर ते 100 मिलिमीटर असा पडेल.
वाऱ्याचा वेग कमी असेल परंतु पाऊस मोठा प्रमाणात राहील असे हवामान शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
शासनासह विविध रिसर्च इन्स्टिट्यूटच्या हवामान विषयक वेब साईट वर देखील हे अंदाज वर्तविण्यात आले आहेत .
सायंकाळी 5 ते मध्यरात्रीपर्यंत पावसाचा वेग वाढेल असा अंदाज आहे