पेण खोपोली रस्त्यावर रुंदीकरणात आडवी येणारी झाडे भुईसपाट
Team Maharashtra Mirror10/19/2020 10:51:00 PM
0
पेण खोपोली रस्त्यावर रुंदीकरणात आडवी येणारी झाडे भुईसपाट
झाडे लावा जीवन जगवा,नारे देणारे कुठे झाले गायब?
पेण खोपोली महामार्गाचे रुंदीकरण सुरू असून या रुंदीकरणात अनेक कित्येक वर्षे जुनी असलेली झाडे भुईसपाट केली जात आहेत मात्र वृक्षप्रेमी कुठे गायब झालेत त्यांचे त्यांनाच माहिती.पर्यावरण रक्षणाचा ठेका घेतलेल्या संस्था आणि पर्यावरण प्रेमी वानगीदाखल पण उरलेले दिसतं नाहीत.मुंबईत आरेचे कारशेड पर्यावरण प्रेमींनी हटवले अखेर मात्र या रस्त्याला कोणीवाली नसल्याने बेसुमार वृक्षांची कत्तल होत आहे,आजही या रस्त्यावर आजोशी गावाजवळ झाडे तोडण्याच्या कामामुळे ट्रॅफिक जाम झालेले पाहायला मिळतं