अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थेतील मुलांना फळे वाटप - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, October 19, 2020

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थेतील मुलांना फळे वाटप

 अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थेतील मुलांना फळे वाटपराम जळकोटे-उस्मानाबाद         स्वराज्य रक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भान जपत सूर्यक्षितीज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बकोरी, ता. हवेली येथील माहेर संस्थेतील मुलांना फळे वाटप करण्यात आली. 

        स्वराज्यातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या अर्धांगिनी महाराणी येसूबाई यांची भूमिका स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून अजरामर करणाऱ्या प्राजक्ता गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माहेर संस्थेच्या 100 मुलांना यावेळी फळे देण्यात आली. या प्रसंगी फाउंडेशन चे संस्थापक दादा वाळके पाटील, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोरक्षराजे वाळके पाटील, राज्य कार्याध्यक्ष गजानन गव्हाणे पाटील, हर्षल वाळके, आकाश कदम, पूनम हरगुडे आदी फाउंडेशन चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.       मागील काही वर्षांपासून सुर्यक्षितीज फाउंडेशन च्या माध्यमातून गरजू मुलांना शालोपयोगी विविध साहित्य वाटप करण्यात येत आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत समाजात राहून समाजासाठी झटणाऱ्या पोलीस, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी आदींचा सुर्यक्षितिज फाउंडेशन कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे फाउंडेशन चे राज्य अध्यक्ष गोरक्षराजे वाळके यांनी यावेळी सांगितले. माहेर संस्थेच्या वतीने फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत व आभार माहेर च्या सूर्यकांत गुलदेवकर, संगीता गुलदेवकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment